सांगोला – इ.१२ वी परीक्षेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. यामध्ये कला शाखा ९३.५७, वाणिज्य शाखा ९९.१५, शास्त्र शाखा ९८.०१ व एकूण निकाल ९७.५० टक्के लागला आहे.
कला शाखेमध्ये हर्षदा गेजगे, आरती गोडसे ८३.६७, विशाखा सोनवणे ८३.१७, अस्मिता इंगोले ७९.८३, वाणिज्य शाखेमध्ये लक्ष्मी गोडसे ९०.३३, आर्या घोंगडे, वैष्णवी रणदिवे ९०, मृणाली लांडगे ८८.३३, शास्त्र शाखेमध्ये ऋचाश्री चव्हाण ८६.६७, स्वरदा वांगीकर ८६.५०, धीरज जगताप ८५ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सां.ता.शि.प्र.मंंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, सचिव म.शं.घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, प्राचार्य बिभिषण माने, उपमुख्याध्यापक चारूदत्त जगताप, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, काकासो नरूटे, उत्तम सरगर यांनी अभिनंदन केले..
गणित विषयात स्वरदा वांगीकर पुणे बोर्डात प्रथम
गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत शास्त्र शाखेतील विद्यार्थिनी स्वरदा वांगीकर हिने पुणे बोर्डात प्रथम क्रमांक पटकाविला.
























