सांगोला – महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सांगोला नगरपरिषदेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह प्रांगणात लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताच्या सुरांमध्ये तिरंग्याला सलामी देण्यात आली.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, सदस्य, नागरिक, माजी सैनिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आनंदा माने यांनी सांगोला शहरवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ.सुधीर गवळी यांनी दि.१ ते १५ मे पर्यंत वेळेची बचत व अचूक माहिती नोंदविण्याच्या दृष्टीने आपल्या घरून स्वगणना करण्याविषयी आवाहन केले.
यावेळी माजी सैनिक, वीर माता व पत्नी यासोबतच नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी बांधवांचा सन्मान करण्यात आला.

























