सांगोला – तालुक्यातील कडलास हायस्कूल कडलास प्रशालेस एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोलापूरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, नवीमुंबईचे नगरसेवक कदम, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र मुख्याध्यापक नागनाथ दुधाळ यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गिरीश गायकवाड, संतोष रायबान, युवराज गायकवाड, रमेश सावंत, दत्तात्रय गोडसे, आलोक पवार, गणेश भजनावळे आदी उपस्थित होते.
कडलास प्रशालेने शैक्षणिक व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान केल्याचे राज्य अध्यक्ष अडसूळ सर यांनी सांगितले.























