सोलापूर – महाराष्ट्र खो-खो कुमार संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य म्हणून निवड झालेले सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे व सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड झालेले असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण यांचा सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सरचिटणीस उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे, सहसचिव मोहन रजपूत, राजाराम शितोळे, सुरेश खुर्द, गुलाम मुजावर, शरद व्हनकडे, धोंडीराम पाटील, जावेद मुलाणी, सोमनाथ बनसोडे, अजित शिंदे, पुंडलीक कलखांबकर व अजित बनकर आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.



























