Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक

तरुण भारतbyतरुण भारत
May 8, 2026
in editor
0
वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : जिल्ह्यातील वर्ग-२ जमिनी, प्लॉट आणि घरांच्या वर्ग-१ प्रक्रियेत महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या कथित अडवणुकीविरोधात शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक झाले आहेत. हजारो प्रकरणे प्रलंबित राहिल्याने जमीन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, शासनाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही महसूल विभागाकडून वर्ग-२ जमिनी व प्लॉट वर्ग-१ करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही होत नाही. रहिवासी वापरातील प्लॉट आणि घरांना शासनाने सवलत जाहीर केली असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये शासन आदेशात नसलेली अतिरिक्त कागदपत्रे मागवून फाईली महिनोनमहिने प्रलंबित ठेवल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भूसंपादन विभाग, अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणि सामान्य प्रशासन विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याचाही गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.


शेतकरी व प्लॉटधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये सर्व वर्ग-२ प्रकरणे ई-ऑफिस प्रणालीद्वारे निश्चित मुदतीत निकाली काढणे, प्रत्येक पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेणे, विशेष शिबिरे आयोजित करून प्रकरणे मार्गी लावणे तसेच मुद्दाम फाईली प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सेवा हमी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर उमेश राजेनिंबाळकर,अमित राजेनिंबाळकर,सुभाष पवार, खलील सय्यद,ललित चौधरी,अर्जुन पवार,अजिंक्य राजेनिंबाळकर,आनंद जगदाळे,अनिरुद्ध कावळे,अमरसिंह जगदाळे,सागर देशमुख,अमित राजगुरू, ॲड.रणजीत वाकुरे,ॲड,किरण बावळे,ॲड. बळीराम लोमटे,ॲड.आनंद फाटक,ॲड प्रशांत कस्तुरे,सुनिल महाजन, अभिजीत पवार, संजय पवार, अतुल महाजन,अमजद तांबोळी, निलेश वाघमारे, प्रसाद राजे, राजेश बांगड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 46
Previous Post

अखेर ते अधिकृत होर्डिंग्ज हटवली; दै तरुण भारतच्या वृताचा दणका

Next Post

उपवर्गीकरणाविरोधात आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उपवर्गीकरणाविरोधात आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

उपवर्गीकरणाविरोधात आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1040839

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!