सोलापूर – डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये उत्कृष्ट यश संपादन करून संस्थेचा गौरव वाढवला आहे.
यावर्षी शाळेमध्ये सर्व प्रथम विद्यार्थिनी अदीबा ए. कांबळे हिने 94% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांत तसेच आयेशा आर. नदाफ हिने 90.20% यांनी द्वितीय तर अफिया एम.आर. शेख हिने 86.20% गुण तृतीय क्रमांक मिळवले. या शाळेच्या विद्यार्थ्यांनीही 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम ठेवली.
संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करत या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याला दिले.

























