Monday, May 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दत्तप्रसाद दाभोलकर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना भूषण पुरस्कार प्रदान

तरुण भारतbyतरुण भारत
May 11, 2026
in editor
0
दत्तप्रसाद दाभोलकर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना भूषण पुरस्कार प्रदान
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा – जात, धर्म, पक्ष ,पंथ या सर्वाला दूर ठेवून स्त्री, पुरुष, नावे उजवे असे कोणतेही मानदंड न लावता सर्वधर्मसमभाव राखत ज्याने समाजासाठी झोकून देऊन काम केले ,त्या व्यक्ती आणि संस्थांनाच हा सातारा  भूषण पुरस्कार दिला जातो आहे असे विचार जेष्ठ शास्त्रज्ञ विचारवंत समीक्षक व लेखक दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केले .

सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या सातारा भूषण पुरस्कार सोहळा वितरण कार्यक्रमात अध्यक्ष भाषणावरून दत्तप्रसाद दाभोलकर बोलत होते . रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, राजकीय तसेच सामाजिक अशा क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला / संस्थेला “सातारा भूषण” पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी ट्रस्टने श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना सदर पुरस्काराने सन्मानित करत  रोख रु. ४०,०००/- व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते .  ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांच्या हस्ते हा सातारा भूषण पुरस्कार श्रीनिवास पाटील यांना प्रदान करण्यात आला .यावेळी जेष्ठ विचारवंत शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोलकर,ट्रस्टचे विश्वस्त डॉ.   अच्युत गोडबोले, उदयन गोडबोले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती

याप्रसंगीआपल्या प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे विश्वस्त  डॉ. अच्युत गोडबोले यांनी, स्वर्गीय भाऊकाका गोडबोले यांनी 5,000 रुपयाची पुंजी घालून सुरुवात केलेला हा ट्रस्ट आज परिवाराने एक कोटी रुपयांच्या निधीपर्यंत नेला असून विविध उपक्रम  ट्रस्ट  मार्फत चालू आहेत .गोरगरीब विद्यार्थी शिक्षण संस्थांना मदत देत आज  स्व . अरुण गोडबोले यांनी 35 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा पुरस्कार विविध मान्यवरांची व्याख्याने ,परिसंवाद ,चर्चासत्रे ,गायन कार्यक्रम  सुरू करून सातारकरांना आनंद मिळवून दिला. पुरस्कार आज श्रीनिवास पाटील यांनी स्वीकारला याबद्दल कृतज्ञता वाटते.

  यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, दर वेळेला गेली 36 वर्षे या पुरस्काराची निवड समितीमध्ये एक विश्वस्त म्हणून काम करताना स्वर्गीय अरुण गोडबोले यांच्या नियोजनाने हा पुरस्कार देण्यासाठी योग्य  व्यक्तीची निवड केली जात होती .आज श्रीनिवास पाटील हे पक्ष विरहित आणि राजकारणाशी संबंधित असलेले अपवादात्मक उदाहरण आहेत. कारण हे राजकारणात जरी होते तरी सुसंस्कृत कसे राहता येते याचे अपवादात्मक उदाहरण म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

 याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्रीनिवास पाटील म्हणाले की ,गोडबोले कुटुंबीयांनी गोड बोलून दिलेले हे देणे आहे .स्वर्गीय अरुण रावांचा शब्द पुढील पिढीने आणि गोडबोले परिवाराने पाळला.  ..  दे लेका नव्हे तर  घे  लेका.. हे होत असताना मध्ये काही वेळ गेला, मात्र मी हा पुरस्कार घेण्याचा शब्द पाळला .आज या पुरस्काराने खरोखरच गोडबोले कुटुंबीयांनी माझी उंची वाढवली आहे .तरकतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी,छोटा स्वर गंधर्व, राजमाता सुमित्राराजे भोसले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांना हा पुरस्कार वितरण होत असताना मी या कार्यक्रमांना उपस्थित होतो. आज शिक्षणाला मदत करणारे रा. ना .  काका फार मोलाची कार्य करणारे ठरले.

 आज हेच कार्य 5000 रुपयाच्या निधीवरून एक कोटीच्या घरात त्यांच्या पुढील पिढीने नेले याचे खूप कौतुक वाटते ,आनंद वाटतो .मान्यवरांच्या ओळीत बसण्याचा मान मला या पुरस्काराने गोडबोले परिवाराने दिला आणि हे सातारा भूषण क्षण मी खऱ्या अर्थाने जगतो आहे. या मिळालेल्या निधीचा वापर मी माझ्या परिवारासोबत पुढील गरजू आणि अपेक्षित व्यक्ती आणि संस्थांसाठीच वितरित करी न आणि घासातील घास व प्रेम वाटून देण्याची बुद्धी मला परमेश्वराने द्यावी अशीच सदिच्छा आणि अपेक्षा मी सर्वांकडून व्यक्त करतो अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले .

यावेळी बोलताना प्राचार्य पुरुषोत्तम शेठ म्हणाले की ,अरुण हा आजातशत्रू असा मित्र होता .रस्त्यावरच्या साफसफाई करणाऱ्या कामगारापासून ते मंत्री आणि मान्यवरांची मैत्री जोडणारा अरुण आपल्यात आज नाही .मात्र त्याच्या अपेक्षेप्रमाणेच हा पुरस्कार त्याचे मित्र श्रीनिवास पाटील यांना वितरित करताना विशेष आनंद होत आहे .विविध चित्रपट निर्मितीत काम करताना सुबल सरकार सारख्या नृत्यदिग्दर्शकाच्या शस्त्रक्रियेसाठी 50,000 ची मदत करणारा अरुण आम्ही विसरू शकत नाही .आज स्वर्गीय अरुणची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. मात्र त्याने घालून दिलेली ही वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा व धुरा आज गोडबोले परिवार व अच्युत गोडबोले पुढे नेत आहेत. त्या खंड पडू दिला नाही याची विशेष कौतुक वाटते . कारण परंपरा संपून वेगळे रूप  प्राप्त होते, मात्र  ट्रस्ट  ने आपले काम योग्यपणे पुढे ठेवले आहे आणि मैत्री कशी जपावी याचे हे उत्तम उदाहरण आज आपण श्रीनिवास पाटील यांना पुरस्कार देताना पाहत आहोत .श्रीनिवास पाटील यांचे सुरू असलेले सामाजिक बांधिलकीचे काम या पुरस्काराने अधिकच वृद्धिंगत होणार आहे. तसेच जनतेच्या मनातील त्यांचे स्थान असेच आढळ राहील अशा शब्दात त्यांनी श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा दिल्या .

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. याप्रसंगी  प्राचार्य रमणलाल शहा, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे,डॉ. सुहास जोशी, विनोद झंवर, डॉ.चैतन्य गोडबोले, उदयन गोडबोले ,आर्यन गोडबोले , दिलीप भट्टड, कन्हैयालाल राजपुरोहित, रमण वेलणकर,हरेश जोशी,डॉ.धनंजय देवी, प्रकाश गवळी, हेमंत बर्गे, श्रीराम नानल,  दिलीप पाठक, सौ.गौरी तामणकर, गौतम भोसले, अविनाश लेवे, प्रकाश बडेकर, सारंग पाटील,श्रीकांत शेटे.अनिल काटदरे, श्रीनिवास पाटील परिवाराचे कुटुंबातील सदस्य , ग्रामस्थ यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post Views: 13
Previous Post

प्रेमाच्या अनुभूतींनी रंगली काव्य संध्या

Next Post

ठिबक सिंचन संच चोरणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ठिबक सिंचन संच चोरणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघड

ठिबक सिंचन संच चोरणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघड

ताज्या बातम्या

पंढरपूर कॉरिडॉरची ए आय झलक #viral

May 11, 2026
एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत चाटे क्लासेसची उत्तुंग भरारी, यशाची दैदिप्यमान परंपरा कायम

एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत चाटे क्लासेसची उत्तुंग भरारी, यशाची दैदिप्यमान परंपरा कायम

May 11, 2026
उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक संघटनेचा “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार”

उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक संघटनेचा “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार”

May 11, 2026
दहावी परीक्षेत सुलाखे हायस्कूलचे उज्ज्वल यश

दहावी परीक्षेत सुलाखे हायस्कूलचे उज्ज्वल यश

May 11, 2026
बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

May 11, 2026
चार किलो गांजासह तरुणास अटक 

चार किलो गांजासह तरुणास अटक 

May 11, 2026
अवैध दारू वाहतूक पकडली…20 लाखाचा मुद्देमाल जप्त ; तीन आरोपी ताब्यात

अवैध दारू वाहतूक पकडली…20 लाखाचा मुद्देमाल जप्त ; तीन आरोपी ताब्यात

May 11, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीत ४,३९२ प्रकरणे सामंजस्याने निकाली

राष्ट्रीय लोक अदालतीत ४,३९२ प्रकरणे सामंजस्याने निकाली

May 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0857852

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697