पंढरपूर – तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतची दोन वर्षापुर्वी स्थापना झाली असुन ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अमोल जाधव प्रशासक सहायक गटविकास अधिकारी अरूण भुजबळ ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रीय सहभाग घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे.त्याची शिरूर अनंतपाळ (जिल्हा लातूर) येथील तालुकास्तरीय पथकाकडून शुक्रवारी तपासणी करण्यात आली आहे.
राज्यातील विविध गावांचा शाश्वत विकास होऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणुन ५ लाखा पासुन ५ कोटी रूपया पर्यंतची रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले असुन,या अभियानात सहभाग घेतलेल्या तालुक्यातील १९ गावाची शिरूर अनंतपाळच्या तालुकास्तरीय पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.यामध्ये दोन वर्षापुर्वी स्थापन झालेल्या चिंचणी गावाने लोकसहभाग,लोकवर्गणी,शासन निधी या माध्यमातून नेत्रदिपक कामे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर व समृद्ध गाव संकल्पनेस सत्यात उतरवण्याचे काम चिंचणी ग्रामपंचायत यानी केले आहे. यामध्ये ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, वृक्षलागवड, परसबाग, गुणवत्तापुर्ण शाळा, अंगणवाडी आरोग्यसेवा ,स्मशानभूमी, जलजीवन व्यवस्थापन ,शुद्ध पाणी पुरवठा,घरकुल बांधकाम, समृद्ध ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सुशासनाच्या कामाचा समावेश आहे.त्याची शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे पथक प्रमुख गटविकास अधिकारी रविंद्र साचणे, विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे,पत्रकार रमेश मुळे ,अभियंता अविनाश मोरे,रूपाली हटकर, पर्यवेक्षिका अनुसया खलंग्रे,समन्वयक लक्ष्मण नाटकरे यांच्या पथकाने सखोल तपासणी करून मूल्याकंन केले आहे.
————–
(टाॅपच्या पाच गावाना पुरस्काराची अपेक्षा….)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यातील १९ गावानी सक्रीय सहभाग असला तरी यातील टाॅपच्या पाच गावाना पुरस्काराची अपेक्षा आहे.यामध्ये चिंचणी,तुंगत,नारायण चिंचोली गोपाळपुर,धोंडेवाडी,सरकोली,भोसे यासह विविध गावाचा समावेश आहे.मूल्यांकन निकालानंतरच ही बाब स्पष्ट होणार असुन,जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय पथकाकडूनही तपासणी होणार आहे.
——————–
( निकष आणि मुद्याच्या अधारे तपासणी.. )
स्वयं मूल्यांकनाचे गुण आणि त्याबाबत ऑनलाइन दाखल केलेले पुरावे यांची आठ निकष आणि अडोतीस मुद्दे याच्या आधारे सखोल पडताळी करून निष्पक्ष मूल्यांकन तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे उत्कृष्ट कार्य करणारीच गावे निवडले जातील.

























