श्रीपूर – ता . माळशिरस येथिल गणेश हॉल मध्ये महाराष्ट्र शासनाने महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख , कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबीराचे आयोजन केले होते या शिबीरात ४१० दाखल्यांचे वितरण करण्यात आले .
महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात येत असलेल्या समाधान शिबीराची अधिक माहीती देताना माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम यांनी सध्या १० वी व १२ वीच्या परिक्षांचे निकाल लागले असून विद्यार्थांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले , तसेच शेतकऱ्यांना प्रलंबीत फेरफार , डिजीटल ७ / १२ उतारा , रहिवासी , जातीचे प्रमाण पत्र , तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन , पाणंद सस्ते प्रशासकीय मान्यता एकाच ठीकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्ट्रीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले . शिबिरामुळे विद्यार्थी व पालक तसेच शेतकरी वर्गास हेलपाटे न मारता एका दिवसात दाखले मिळणीची सोय होत असल्याचेही ते म्हणाले .
तसेच महाराष्ट्र शासनाने शेतकरी वर्गासाठी पाणंद रस्ते , वनक्षेत्र वगळता १ जानेवारी २०११ पूर्वी शासन जागेवर राहत असलेल्यांची अतिकमणे नियमित करणे , यामध्ये गायरान जमिनीवर राहणाऱ्यांची नावे लागणार परंतू सर्व क्षेत्रावर ग्रामपंचाईतीची नोंद लागणार आहे असे क्रांतीकारक निर्णय घेतले असून अशा रहिवाशांनी त्वरीत आपल्या नोंदी करून घेण्याचे आवाहन केले .
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन नायब तहसीलदार अमोल कदम , मंडल अधिकारी शरद खंडागळे , पं . स . सदस्य आप्पा कदम यांचे हस्ते करण्यात आले या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस ( श प ) गटाचे संदीप सुरेश घाडगे , बोरगांवच्या पोलीस पाटील मनीषा पाटील , दिलीप मिसाळ , विनायक केचे , विरेंद्र पाटील , नितीन घाडगे उपस्थित होते .
प्रास्ताविक महाळुंगचे तलाठी निहाल जाधव यांनी केले कार्यकमाचे सुत्रसंचालन पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी केले .
महाळुंग मंडल मधील सर्व महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले . शिबिरास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला .

























