
जालना : जालना येथील भाजपाचे संतोष उत्तमराव क्षत्रिय यांनी भाजपाचे
ध्येय धोरण पटत नसल्याने त्यांनी परत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत
प्रवेश केला. यावेळी त्यांचा भगवी शाल देवून सत्कार करण्यात आला. यावेळी
शिवसेनेचे शहरप्रमख दीपक रननवरे, शहर संघटक संदीप झारखंडे, चेतन भुरेवाल,
सुदाम काळे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपशहरप्रमुख पदी त्यांची
नियुक्ती करण्यात आली. यावेळी संतोष क्षत्रिय म्हणाले की, शिवसेना
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात मजबुत व शिवसेनेचे बळकटीकरण करण्यासाठी
परिश्रम घेणार असल्याचे संतोष क्षत्रिय यांनी सांगितले.
००००००००००
फोटो ओळी…..
१०-जालना येथील भाजपाचे संतोष उत्तमराव क्षत्रिय यांनी शिवसेना (उध्दव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,
शहरप्रमुख दिपक रननवरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांचा
भगवी शाल देवून सत्कार करण्यात आला.





















