अकलूज – संपूर्ण देशभर पुकारण्यात आलेला औषधे विक्री दुकानांचा संप 100% यशस्वी झाला असल्याची माहिती माळशिरस तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व उपाध्यक्ष योगेश गायकवाड गांधी यांनी दिली याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले सध्या ऑनलाईन पद्धतीने औषधे खरेदी विक्री सुरू असून यामध्ये अनेक जीवघातक औषधेही विकली जात आहे त्यामुळे ऑनलाईन विक्री बंद व्हावी व इतरविविध मागण्यासाठी हा देशभर संपर्क करण्यात आलं होत माळशिरस तालुक्यात 750 मेडिकल दुकाने असून सर्वच्या सर्व दुकाने बंद होती असोसिएशनच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन देण्यात आले त्यांनीही याबाबत केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे आपले मागणे मांडू असे सांगितले




















