
ओंकार गायकवाड याविरुद्ध २०२२, २०२३, २०२४ आणि २०२६ या कालावधीत दागिने आणि मोबाईल चोरी करणे यासारखे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा देखील सुनावली आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत तत्कालीन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी ओंकार गायकवाड यावर सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आहे .




















