माळशिरस – तालुक्यातील कदमवाडी, गारवाड,मगरवाडी या तीन गावांतील २३ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार असून आज सदरचे टँकर त्या त्या गावांना रवाना होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे पाणी पुरवठा उपअभियंता जे .व्ही सदावरे यांनी सांगितले .यावेळी शाखा अभियंता ए.एन,आंबले,जे व्ही .घोळवे,वरिष्ठ सहाय्यक एस .आर,करांडे.सहा.स्थापत्य अभियंता एस आर मोरे आदी उपस्थित होते
कदमवाडी येथील गावठाण ,भोसले वस्ती, कदमवस्ती, मजगे वस्ती, पाववस्ती, जुनी वाडी, इंगळे वस्ती, चवंडी या आठ वस्त्यावर २५ हजार ली क्षमतेच्या टँकरच्या दोन खेपा दररोज करण्यात येणार आहेत
गारवाड येथील गावठाण, बाबरवस्ती , चिकाटे वस्ती, सुळकी शेत, रानमळा, राऊत वस्ती, पाटिल वस्ती, शिंगटे वाटी,, या आठ वस्त्यावर २४ हजार ली क्षमतेच्या टँकरच्या दोन खेपा दररोज करण्यात येणार आहेत.
मगरवाडी येथील नामदेव धोंडी वस्ती, रेणुकाताई पाटील वस्ती, लोंढे वस्ती,पाटील वस्ती, भंडार मुळा, कुंबर मळा या सात वस्त्यावर २४ हजार ली क्षमतेच्या टँकरची रोज एक खेप दररोज करण्यात येणार आहेत .
यापूर्वी पळसमंडळ, सुळे वाडी,पिंपरी या तीन ठिकाणी टँकर सुरू असून आता तीन टँकर असे सहा टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
Post Views: 11