मार्केट यार्ड मध्ये बोलेरो वाहनाखाली सापडून झोपलेला हमाल जखमी – ड्रायव्हर वर गुन्हा दाखल
सोलापूर – काम करून दुकानासमोर झोपलेल्या एका हमालाच्या अंगावरून गाडी घालून त्याला जखमी केल्याप्रकरणी माढ्याच्या एका बोलेरो चालकाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
विशाल सतीश ताटे (रा. मु.पो. शेडशिगे, ता. माढा, जि. सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत यशपाल सुरेश उडाणशिव (रा. १३७, मुकुंद नगर, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादीचा भाऊ अनिरुध्द हा दि. २० मे रोजी पहाटे १.३० वा चे सुमारास मार्केट यार्ड येथील सुर्या हॉटेल येथील आडत दुकानासमोर हमालीचे काम करुन झोपला असता वरील आरोपीने बोलेरो पिकअप (क्रं. एम एच ०४ के यु ०१२९ ) वाहन हयगईने चालवून फिर्यादीच्या भावाच्या अंगावर घातली . यात डोक्याला गंभीर जखम व पायाला मुका मार आणि सर्वांगास खरचटण्यास आरोपी कारणीभूत झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार राठोड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
चोरी करताना हटकल्याने रॉड घातली डोक्यात – एक जखमी ; शेजारच्या तरुणावर गुन्हा दाखल
सोलापूर – चोरी करताना हटकल्याने एकास लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याप्रकरणी शेजारच्या तरुणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
धिरज सिंगे (रा. भवानी पेठ, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत अमित सुभाषचंद्र बिराजदार (रा. गुजर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी व त्याचा मित्र त्रिलोक, मुकेश असे मिळुन मुकेश याचा वाढदिवस असल्याने त्याचे घरी गुजर वस्ती येथे दि. १६ मे रोजी पहाटे १.३० वा चे सुमारास दारु पित बसले होते . त्यावेळी शेजारी राहणारा यातील वरील आरोपी धिरज सिंगे हा चोरीच्या उद्देशाने यातील फिर्यादीच्या बहिणीच्या घरात डोकावत होता . त्यावेळेस फिर्यादी व मित्रांनी आरोपीला पकडत असताना तो तावडीतुन पळुन जाण्याचा प्रयत्न करत होता . तेव्हा त्यास विचारले असता चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली. यादरम्यान आरोपीने त्याचे घरी जावून घरातुन लोखंडी रॉड आणुन फिर्यादीचे कपाळावर मारुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार पैकेकरी हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
खर्चासाठी व कर्ज फेडण्यासाठी आठ लाख आन म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ – पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर – घर दुरुस्तीसाठी झालेले खर्च व कर्ज फेडण्यासाठी आठ लाख रुपये आण म्हणून व सोलापूर शहरात प्लॉट घेऊन दे म्हणून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी ठाणे येथील एका पतीसह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पती – अकबर मकानदार, दौलतबी मकानदार, चांदसाब मकानदार, फरजाना शेख आणि यास्मीन पटेल ( सर्व रा.रितु वर्ल्ड कॉम्प्लेक्स, डि मार्ट जवळ, बॅरेज रोड, बदलापुर, ठाणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत शाहिन अकबर मकानदार (रा. ३७/२, मदनी नगर, विजापूर रोड, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी दि. २० मे २०२२ रोजी पासुन ते १६ जून २०२५ रोजी दरम्यान सासरी नांदत असताना वरील आरोपींनी मिळून फिर्यादीस वेळोवळी घराचे दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चापोटी व लोन फेडण्यासाठी आठ लाख रु घेवून ये व सोलापूर येथे नवीन प्लॉट घेवून दे या कारणावरुन शिवीगाळ मारहाण तसेच मानसिक व शारीरीक छळ करुन उपाशी पोटी ठेवून जाचहाट केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार घुगे हे गुण्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 4