Thursday, May 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने इंगळे यांचा मानपत्र देऊन सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in west maharashtra
0
इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने इंगळे यांचा मानपत्र देऊन सन्मान
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचा इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुहास पाटील व सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील महेश इंगळे कुटूंबियांच्या पिढीजात स्वामी सेवेप्रित्यर्थ महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.
      कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित भक्तांकडून महेश इंगळे यांचे औक्षण करून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत उत्साहात स्वागत करण्यात आले. सुहास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात महेश इंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम, उद्योजक नितीन वाडीकर, कृपासिंधु चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटील, करवीर पंचायत समितीचे सदस्य रविंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
        या प्रसंगी उपस्थित हजारो भाविकांच्या वतीने अखंड नामजप, टाळ-मृदुंगाचा निनाद, स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी आणि श्री स्वामी समर्थ या जयघोषाने परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला होता. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती.
         या कार्यक्रमात कोल्हापूर व परिसरात सामाजिक, सेवाभावी आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी भक्तांचा प्रमुख पाहुणे महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी महेश इंगळे यांची सभागृहात प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत महेश इंगळे यांनी अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानाचे महत्त्व, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला, नामस्मरणाची शक्ती आणि भक्तीमधील सातत्य याविषयी अत्यंत हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. यानंतर महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या वतीने नामजप सोहळा संपन्न झाला. नामजपाने उपस्थित हजारो स्वामी भक्त मंत्रमुग्ध झाले. भक्तांनी एकचित्ताने स्वामी नामाचा जप करत परिसर अध्यात्मिक ऊर्जेने भारून टाकला.
टाळ, मृदुंग आणि विणेच्या सुरेल साथीने वातावरण अधिकच भक्तिमय बनले. महिलांनी व पुरुषांनी भजनाच्या तालावर भक्तिभावाने नृत्याचा ठेका धरत स्वामी नामात तल्लीन होऊन आनंदोत्सव साजरा केला, शेवटी महेश इंगळे आणि सुहास पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याकार्यक्रमामुळे कोल्हापूर परिसरात भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे नियोजन चोपदार नारायण यादव, मनोज माने, रमेश माने, वेणू सुतार, यशवंत चव्हाण आदींनी केले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम, रविंद्र पाटील, महेश मालक इंगळे मित्र परिवारातील प्रा.शिवशरण अचलेर सर, अंकुश केत, ज्ञानेश्वर भोसले, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, सोमनाथ सुतार, सागर गोंडाळ, श्रीकांत झिपरे, मनोज जगताप सर, विश्वनाथ देवरमनी सर, कुमार हत्तुरे, कलशेट्टी सर, विद्याधर गुरव सर, रमेश शिंदे सर, सुनिल पवार, काका सुतार, सुरेश वाले सर, ओमकार उटगे, स्वामीनाथ मुसळे, अमर पाटील, संदीप पंडीत, नामदेव माने आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 13
Previous Post

श्री चौडेश्वरी देवीची यात्रा उत्सवाची सांगता कड़ी जत्री कार्यक्रमाने झाली

Next Post

वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्काराने महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेचा पुण्यात सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्काराने महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेचा पुण्यात सन्मान

वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्काराने महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेचा पुण्यात सन्मान

ताज्या बातम्या

शहरात बकरी ईद आनंदात साजरी #solapurnews #viral

May 28, 2026

अधिकाऱ्यांवर संतापले झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष #solapurnews #marathinews

May 28, 2026

अरे देवा गंभीर रुग्णाला दाखल केल्यानंतर चक्क पेटली रुग्णवाहिका

May 28, 2026

अरे देवा गंभीर रुग्णाला दाखल केल्यानंतर चक्क पेटली रुग्णवाहिका

May 28, 2026

बघा आता वह्या पुस्तकेही झाली महाग #marathinews

May 28, 2026

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्याला केले जेरबंद #viral #solapurnews

May 28, 2026

पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला रीलस्टारचा संसार थेट केली आत्महत्या

May 28, 2026

पेट्रोल डिझेल चोरीबाबत थेटच बोलले जिल्हाधिकारी #solapurnews #viral

May 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0883196

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697