पंढरपूर – नोकरी किंवा व्यवसाया बरोबरच प्रपंच्याचा गाडा हाकतानाप्रत्येकालाच ताणतणावातून जावे लागत असते. त्यामुळे या ताणतणावातून काही काळ आनंदाचेक्षण जोपासण्यासाठी निदान वर्षातून एकदा तरी माजी विद्यार्थी मेळाव्या सारख्या कार्यक्रमांचेआयोजन करणे आवश्यक आहे. कारण अशा कार्यक्रमांतून किंवा मेळाव्यातून जीवनाला एक प्रकारे ऑक्सिजन मिळतो आणि हाच ऑक्सिजन वर्षभर आनंदी, उत्साही राहण्यासाठी पुरसे असतो ’असे विचार मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा.वैशाली घोंगडे यांनी मांडले.
बिजापूर (कर्नाटक) मधील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा संचलित डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयातील सन १९९६ च्या बॅचमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चिंचणी (ता.पंढरपूर) मधील निसर्गरम्य परिसर असलेल्या ‘चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रात’ हा ‘माजी विद्यार्थी मेळावा’संपन्न झाला. याप्रसंगी मुख्य आयोजिकेच्या भूमिकेतून प्रा.वैशाली घोंगडे या मार्गदर्शन करीत होत्या.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते व तत्कालीन प्राचार्य डॉ.व्ही.आर.देवगिरी यांच्या कडक शिस्ती पासून ते विद्यार्थ्यांच्या चुकांवर पांघरूण घालणारे व वेळ परिस्थिती पाहून समजून-उमजून घेणारे गुरुजनवर्गांच्या आठवणी या ‘मेळाव्या’च्या माध्यमातून निघाल्या. पंढरपूर-पुणे हायवे लगत असलेल्या पिराची कुरोली ते टप्पा पासून दिड किमी अंतरावर असलेल्या चिंचणी मधील दाट हिरवळींनी वेढलेल्या शासनाच्या कृषी पर्यटन केंद्रात हा मेळावा घेण्यात आला. यामेळाव्यात ना पैशाची घमंड, ना पदाचा गर्व दिसून आला, दिसत होती ती केवळ मैत्री आणि मैत्रिच.
प्रशासकिय अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, नगरसेवक, उद्योजक, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षणतज्ञ, संस्थापक आदी सर्वजण सर्व एका वनराईत जमा झाले होते. या मध्ये काहीजण शिक्षणक्षेत्र सोडून स्वतःची कंपनी, मार्केटिंग फिल्ड, एस.टी. महामंडळ, यामध्ये स्थिरावले आहेत.तर काही शिक्षण क्षेत्रा बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदावर काम करतअसलेले हे सर्व मित्र आज ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’च्या चिंचणीच्या निमित्ताने हिरव्यागार पर्यटन केंद्रात एकत्रित आले होते.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आलेल्या अनुभवांचा पुढे कसा फायदा झाला हे काहींनी सांगितले ‘माजी विद्यार्थ्यांनीआपल्या मनोगतातून ‘पैसे सर्वच जण मिळवतात, परंतु अनुभव हास्वतःलाच मिळवावा लागतो. त्यासाठी स्वतःलाच प्रचंड परिश्रम करण्याची गरज असते.कारण आईच्या कुशीनंतर महाविद्यालयीन जीवनातच प्रेम, आपुलकी मिळते. प्राध्यापकांनी वेळप्रसंगी आम्हाला घडविण्यासाठी आमच्या भवितव्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचासुरवातीला राग आला परंतु आम्ही ज्यावेळी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभेराहतो त्यावेळी येथील शिस्त व केलेले संस्कार याचा खूप फायदा होतो हे लक्षात आले.’असेही उदगार काहींनी काढले.
या बहारदार मेळाव्यात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, पुणे, धाराशिव आदीजिल्ह्यातील जवळपास ७० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. शशिकांत मल्लाडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
—————
चौकट : ( मित्र मैत्रिणींच्या
विचारांची देवाणघेवाण गरजेची ) ‘महाविद्यालय जीवन संपल्यानंतर
नोकरीकरताना जीवनात अनेक चढ उतार येत असतात. परिवार आणि महाविद्यालयाचे कामकाज सांभाळणेहे करताना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी प्रत्येकाला सामोरे जाणे हे एकप्रकारचे आव्हान असते. हे आव्हान जीवंत ठेवण्यासाठी आपल्या बाल मित्र-मैत्रिणीच्या विचारांची देवाणघेवाण होणे गरजेचे असते.
—————-
चौकट ( भलीमोठी भाषणे, सुरेल गीतांन
ीदिवस सरला )
ताण तणाव, कामाचा लोडबाजूला सारून मेळाव्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित आले होते. आचार विचारांची देवाणघेवाण करत दिवस सरला. दिवसभर आयोजिलेल्या कार्यक्रमात अनेकांनी जुन्याआठवणींना उजाळा देत काहींनी भलेमोठे भाषण ठोकले तर काहींनी सुरेल गीत गायले.
Post Views: 19