सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या ४९५ आशा स्वयंसेविकांच्या डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील ८६ लाख ६४ हजार १७० रुपये इतके मानधन आज थेट खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच एप्रिल महिन्याचे १७ लाख ७१ हजार ८९७ रुपये मानधन सोमवारपर्यंत जमा होणार आहे. सर्व मिळून १ कोटी ४ लाख ६३ हजार ६७ रुपये इतके अनुदान आशा स्वयंसेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.
महापालिका प्रशासनाकडून आशा वर्कर्स यांनी केलेल्या विविध आरोग्यविषयक कामांचा तपशील नियमितपणे शासनाकडे पाठविला जातो. शासनाकडून मंजुरीनंतर संबंधित कामांचे मानधन थेट आशा वर्कर्सच्या बँक खात्यावर आरबीआयमार्फत जमा केले जाते. सोलापूर महापालिका आरोग्य प्रशासनाने यासंदर्भात आवश्यक ती सर्व कार्यवाही केली आहे. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत ४९५ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. त्यांचे डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील ८६ लाख ६४ हजार १७० रुपये इतके मानधन आज थेट खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच एप्रिल महिन्याचे १७ लाख ७१ हजार ८९७ रुपये मानधन सोमवारपर्यंत जमा होणार आहे. अशाप्रकारे सर्व मिळून १ कोटी ४ लाख ६३ हजार ६७ रुपये इतके अनुदान आशा स्वयंसेविकांच्या खात्यात जमा केले जात आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या आशा स्वयंसेविका माता-बाल आरोग्य, लसीकरण, जनजागृती, सर्वेक्षण तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे मानधन जमा झाल्याने आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Post Views: 13