Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मान्सूनपूर्व उपाययोजनांमध्ये दिरंगाईप्रकरणी नगर अभियंता सारिका आकुलवार यांची एक वार्षिक वेतनवाढ स्थगित

तरुण भारतbyतरुण भारत
May 30, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : मान्सूनपूर्व नाले सफाई, खोलीकरण-रुंदीकरण आणि पूरनियंत्रण उपाययोजनांमध्ये झालेल्या दिरंगाईप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेने कठोर कारवाई करत प्रभारी नगर अभियंता सारिका गंगाराम आकुलवार यांची एक वार्षिक वेतनवाढ स्थगित केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कडक भूमिका घेऊन ही कारवाई केली आहे. त्यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
         गतवर्षीच्या पावसाळ्यात शहरातील पनाश अपार्टमेंट व मंत्री चंडक परिसरात जवळपास दोन महिने पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुख म्हणून नगर अभियंता कार्यालयाकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच संबंधित भागातील नाले व पाणी निचरा कामांसाठी सन २०२५-२६ आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, कामे न झाल्याने निधी व्यपगत झाल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे.
       दरम्यान, शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी पर्जन्यजल-पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा, नाले सर्वेक्षण, बेस मॅप तयार करणे तसेच नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण, गाळ काढणे आणि आवश्यक कामे पूर्ण करण्याबाबत प्रशासनाने वेळोवेळी आदेश दिले होते. मात्र, संबंधित आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सोलापूर शहरात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात, रस्त्यावर
पाणी साचले होते. अशा ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे कामे करून घेणे. वसुधरा कॉलेज, शरदचंद्र प्रशाला, संगमेश्वर कॉलेज या ठिकाणी नोटीस देऊन नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, इतर कामे करणेबाबत आदेश देण्यात आले होते.
        सोलापूर शहरातील पावसाळयापुर्वी सर्व नाल्यांचे खोलीकरण रूंदीकरण करणे, नाल्यातील गाळ काढणे, आवश्यक त्या ठिकाणी करावयाचया कामाचे गणनपत्र तयार करून अंदाजपत्रकिय तरतुदीनुसार मक्तेदारामार्फत आवश्यक त्या ठिकाणी पोकलेन ने व शक्य तेथे मनपा डंपरच्या मदतीनेकाम करण्याबाबत इतिवृत्तांत आपणास आदेश देण्यात आलेले होते.दि. २६ मे रोजी महापौर, सभागृह नेते व सदस्यांनी विभागीय कार्यालय क्र.५ अंतर्गत शिवदारे कॉलेज ते द्वारकाधीश मंदिरलगतच्या नाल्याच्या कामाची पाहणी केली असता, आदेश देऊनही काम सुरू नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधित अहवाल वरिष्ठांकडे सादर करणे अपेक्षित असतानाही आवश्यक कार्यवाही न झाल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व कामांतील विलंबामुळे शहरात पाणी तुंबणे, घरांमध्ये पाणी शिरणे व नागरिकांना त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील नाले सफाई व संबंधित कामे अपूर्ण राहणे ही बाब गंभीर असून कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचविणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आदेशाची पुर्तता झालेली नाही. त्यामुळे मान्सून पुर्व कामकाजात अडचण निर्माण झालेली आहे. यामुळे पावसाचे पाणी घरात शिरून अथवा साचून शहरातील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास सर्वस्वी नगरअभियंता सारिका  आकुलवार या जबाबदार आहेत.
नाल्यांसंदर्भात अनुचित घटना घडल्यास
 नगर अभियंता अकुलवार जबाबदार
           याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ (१) (एक ते तीन) चा भंग झाल्याचे नमूद करत, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२) (ब) नुसार सारिका आकुलवार यांची एक वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने हंगामी स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे.
तसेच भविष्यात नाल्यांसंदर्भात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित नगर अभियंता जबाबदार राहतील, असा इशाराही आयुक्तांच्या आदेशात देण्यात आला आहे.
——-
Post Views: 13
Previous Post

नालेकामात हलगर्जीपणा भोवला; झोन अधिकारी किशोर तळीखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Next Post

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

ताज्या बातम्या

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

सिव्हिल पाच मयत गळफास दोन , एक्सीडेंट एक

May 30, 2026
एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

May 30, 2026
मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

May 30, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

May 30, 2026
राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

May 30, 2026
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

May 30, 2026
खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886267

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697