सांगोला – अधिक महिन्यानिमित्त सांगोला शहरात सध्या भक्तीचा पूर आला असून, दररोज सकाळी विठ्ठल नामाच्या गजरात दत्त मंदिर महादेव गल्ली, विठ्ठल मंदिर कोष्टी गल्ली व वज्राबाद पेठ येथून भव्य दिंडी काढली जात आहे. या आध्यात्मिक उपक्रमामुळे संपूर्ण सांगोला शहर विठ्ठलमय झाले आहे.
हरिनामाचा गजर करत रोज पहाटे दिंडीला सुरुवात होते. वरील मुख्य मंदिरापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून व चौकातून दिंडी फिरते. यामध्ये महिला आणि पुरुष वारकरी पारंपरिक पोशाखात सामील होत आहेत. टाळ, मृदंग आणि वीणाच्या गजराने पहाटेचे वातावरण प्रफुल्लीत होत आहे. सांगोल्यातील महिला वर्ग या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन आणि फुगड्या खेळत महिला विठ्ठलाप्रती आपली भक्ती व्यक्त करत आहेत.
श्री दत्त भजनी मंडळ, दत्त मंदिर, महादेव गल्ली यामध्ये दत्तदेव वांगीकर, श्रीपाद वांगीकर, ऍड.सारंग वांगीकर, ऍड.महेश पत्की, भारत ढोले, सचिन देशपांडे, सतिश बिडकर, प्रा.राजेंद्र ठोंबरे, नंदकुमार हरिदास, मल्हार कुलकर्णी, विवेकानंद कुलकर्णी, रामभाऊ इंगोले, कुमार कुलकर्णी, नंदकुमार लऊळकर, वल्लभ लऊळकर, शामल देशपांडे, सुनिता कुलकर्णी, वीणा लऊळकर, पार्वती कोवाळे, अनुराधा लोखंडे, मंगल चांदणे, माधुरी कुलकर्णी, मीनाक्षी शेटे, रेणुका घोंगडे तसेच श्री विठ्ठल भजनी मंडळ, विठ्ठल मंदिर, कोष्टी गल्ली यामध्ये भास्कर सपाटे, सूर्यकांत दौंडे, रविंद्र बोत्रे, अनिल लाटणे, गणेश भंडारे, गणेश दौंडे, कुलदीप बाबर, संजय दौंडे, धनंजय दौंडे, शैलेंद्र आमने, सुरेश कांबळे व वज्राबाद पेठ भजनी मंडळ, विठ्ठल मंदिर यामध्ये अशोक तेली, हेमंत तेली, अरविंद डोंबे, अशोक जाधव, चंद्रकांत कोरे, दत्तात्रय तेली, प्रभाकर घोंगडे, रत्नाकर पाटणे, मनोज उकळे, रमेश तेली, अजय तेली, विजय तेली, चंद्रकांत तेली, प्रशांत पैलवान, लवटे, छाया तेली, संध्या बोचरे, सुवर्णा तेली, मंगल तेली, वर्षा बिनवडे, आर्यन इंगोले, निवृत्ती तेली, सई बिनवडे, अमोल बिनवडे, रितिका बिनवडे हे दररोज सहभागी होत असतात.
चौकट-
ठिकठिकाणी स्वागत
शहरातील नागरिक आपापल्या घरासमोर सडे-रांगोळ्या काढून या दिंडीचे उत्साहात स्वागत करत आहेत. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी विणेकरी यांची पूजा केली जात आहे. सहभागी भाविकांना प्रसाद वाटप केला जात आहे. अधिक महिन्यानिमित्त सुरू असलेल्या या नित्य दिंडीमुळे सांगोल्यात पंढरपूरसारखेच भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Post Views: 6