बार्शी – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रणवीर राजेंद्र राऊत प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी सावरकरांच्या कार्याला अभिवादन केले.
राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असणारे महापुरुष होते. अस्पृश्यता निवारण, भाषाशुद्धी, अखंड हिंदुस्थान यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रत्येक युवकाने आत्मसात करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले.
Post Views: 16