वेळापूर – माळशिरस तालुक्यातील डी फोर कॅनॉल ला तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना माळशिरस विधानसभेचे माजी आमदार व भाजपचे प्रदेश सचिव राम सातपुते यांनी नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता मोरे यांना दिल्या असून एक ते दोन दिवसांत डी फोर कॅनॉलला पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता मोरे यांनी दिले आहे.
वेळापूर, उघडेवाडी, पिसेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची भेट घेऊन परिसरात पाण्याची पातळी खालावली असून यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगून कॅनॉल ला लवकर पाणी सोडण्याबाबत विनंती केली होती.
यावर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता मोरे यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधला व परिसरातील शेतकऱ्यांची अडचण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने पाणी सोडण्याबाबत विनंती वजा सूचना केली.
दरम्यान कार्यकारी अभियंता मोरे यांनी एक ते दोन दिवसांत म्हणजेच दिनांक 1 जून किंवा 2 जूनपर्यंत डी फोर कॅनॉलला पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे आभार मानले आहेत.
Post Views: 4