पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ जन्मोत्सव सोहळा येथे रविवारी (ता.३१) विविध राजकीय पक्षाचे नेते, विविध सामाजिक संघटना, विविध संस्थांचेपदाधिकारी, समाजसेवक, कर्तुत्ववान मान्यवर, समाज बांधव तसेच समाज भगिनी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
सुशासन व लोकप्रशासन, लोककल्याण, धर्म, त्याग ,न्याय या शब्दांनाआपल्या विचार आणि कृतीतून शंभर टक्के न्याय देणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी नैतिकतेचा आदर्श जगासमोर निर्माण करणाऱ्या अशा धर्मरक्षणी माता अहिल्यादेवीचे चरणी शत शत नमन करतो अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला.
ज्या मातोश्रीने स्त्रीकर्तुत्वाचा आदर्श निर्माण केला. स्त्रीशक्तीला प्रेरित करणाऱ्या, संकटे ही संधीसमजून संकटावर स्वार होणाऱ्या, अभिमान व स्वाभिमानाने महेश्वर राज्याची धुरा समर्थपणेपेलवणाऱ्या राजयोगिनी पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला आपलामानाचा मुजरा म्हणतउपस्थित मान्यवर महिलांमधुन त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी धनगरसमाज बांधवां बरोबरच सर्व जाती,धर्मातील नागरिक मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
Post Views: 4