Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

तरुण भारतbyतरुण भारत
June 3, 2026
in sports
0
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर उभारण्यात आलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीत सुरू असलेल्या ५२ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अनेक संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सोलापूर ॲम्युचर्स खो-खो असोसिएशन आणि किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिव यांनी कुमार व मुली दोन्ही गटांत विजयाची नोंद केली, तर रत्नागिरीच्या मुली संघाने रायगडवर मात करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली.

सोलापूरच्या सिद्धार्थ-समर्थच्या अष्टपैलू खेळीने परभणीचा धुव्वा

कुमार गटातील सामन्यात सोलापूरने परभणीचा ४३-१८ असा एक डाव राखून धुव्वा उडवला. सोलापूरच्या सिद्धार्थ माने-देशमुख (१.२० मि. संरक्षण व ८ गुण) आणि समर्थ जाधव (२.०० मि. संरक्षण व ८ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत सामन्यावर एकहाती वर्चस्व गाजवले. परभणीकडून शिवराज चिंचवड, कृष्णा पुरोहित, वैभव भालेराव आणि वैजनाथ पोळे यांनी प्रत्येकी चार गडी बाद करत झुंज दिली; मात्र सोलापूरच्या आक्रमणापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

मुंबईची जळगाववर मात; विघ्नेश-अंश चमकले

दुसऱ्या सामन्यात मुंबईने जळगावचा ३३-२४ असा ६.२० मि. राखून मोठा पराभव केला. मुंबईच्या विघ्नेश कोरे (२.००, १.३० मि. संरक्षण व ६ गुण) आणि अंश कदम (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला. जळगावच्या आयर्न पवार (नाबाद १, १.३० मि. संरक्षण व ६ गुण) याने एकहाती लढा दिला; मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

प्राजक्ता-स्नेहाच्या जोरावर सोलापूरचा बीडवर डावाने विजय

मुली गटात सोलापूरने बीडचा ४१-१२ असा एक डाव राखून दणदणीत पराभव केला. प्राजक्ता बनसोडे (२.३९, १.४० मि. संरक्षण व ८ गुण) आणि स्नेहा लामकाने (३.०५ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अप्रतिम अष्टपैलू खेळ करत बीडच्या बचावफळीची पुरती मोडतोड केली. बीडकडून दुर्गा नाईकनवरे आणि श्रद्धा खारे (१.१० मि. संरक्षण) यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले; मात्र त्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.

तन्वी-साक्षीच्या खेळीने रत्नागिरीची विजयी सलामी

मुलींच्या दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने रायगडवर ३०-२६ असा एक डाव राखून विजय मिळवला. रत्नागिरीच्या तन्वी खानविलकरने १.२० मि. संरक्षण करत ८ गुण मिळवले, तर साक्षी लिंगायतने १.१० मि. संरक्षण करत ६ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रायगडकडून प्रज्ञा गाडेने १.५० मि. संरक्षण करत १२ गुण अशी दमदार कामगिरी केली; मात्र तिची झुंज अपुरी ठरली.

कुमार गटात सांगली, पुणे, ठाणे, धाराशिवचा एकतर्फी जलवा

कुमार गटातील अन्य सामन्यांत सांगलीने लातूरचा ४५-६ असा एक डाव राखून धुव्वा उडवला, धाराशिवने नंदुरबारचा ३९-१२ असा दणदणीत पराभव केला, पुण्याने नांदेडचा ४८-२० असा एक डाव राखून समाचार घेतला, मुंबई उपनगरने रायगडला ४४-३४ असे ५.२० मि. राखून हरविले, तर ठाण्याने सिंधुदुर्गचा ४९-१२ असा एक डाव राखून अक्षरशः धुव्वा उडवला.

मुली गटातही विजयांची बरसात; सातारा-ठाणे-धाराशिवचा धडाका

मुली गटात सांगलीने जळगावचा ३३-१६ असा एक डाव राखून पराभव केला, साताऱ्याने हिंगोलीचा ३८-४ असा एक डाव राखून धुव्वा उडवला, पुण्याने नांदेडला ४२-१२ असे नमविले, नाशिकने सिंधुदुर्गचा ५४-१० असा एक डाव राखून दणदणीत पराभव केला, ठाण्याने लातूरचा ५२-१२ असा एक डाव राखून चुराडा केला, तर धाराशिवने छत्रपती संभाजीनगरचा ४८-१० असा एक डाव राखून धुव्वा उडवत पहिल्याच दिवशी आपला दबदबा सिद्ध केला.

Post Views: 167
Previous Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

ताज्या बातम्या

माजी मंत्री विजय दादा मोहिते पाटलांची सपत्नीक अनोखी सवारी #marathinews #news

September 6, 2026

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1169635

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!