पंढरपूर -अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने युवराजसंभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकदिनानिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महादेव तळेकर यांनी दिली.
दुर्गराज रायगड किल्ल्यावर दिनांक ५ व ६ जून रोजी प्रतिवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जून १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांनाराज्याभिषेक करण्यात आला होता. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी या हेतूने दरवर्षी दुर्गराज रायगड वर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये यंदा शुक्रवारी (दि.५ जून ) प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन, दुपारी चार वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत करून हजारो शिवभक्तांच्या समवेत गड चढण्यास प्रारंभ, यानंतर गड पूजन तसेच धार तलवारीची,युद्धकला महाराष्ट्राची या युद्ध कलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ, सायंकाळी सातवाजता ढोल वादन, लेझीम प्रात्यक्षिक व वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदुंगाचा गजर, रात्री आठवाजता जागर शिवशाहीरांचा, रात्री नऊ वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, यानंतर वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन होणार आहे.
त्या नंतर शनिवारी (दि.६ जून) शिवराज्याभिषेक दिवशी सकाळी सातवाजता युवराजकुमार शहाजीराजे यांचे हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण, सकाळी साडेसातवाजता शाहिरी कार्यक्रम, साडेनऊ वाजता शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राज्यसभेवर आगमन, सकाळी दहा वाजता युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीस अभिषेक तसेच राजदरबार वरील सिंहासनावरील मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक, त्यानंतर युवराज संभाजी महाराज उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा या कार्यक्रमास प्रारंभ तर दुपारीसाडेबारा वाजता शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून कार्यक्रमाची सांगताहोणार आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमास पंढरपूर शहर व तालुक्यातून हजारोशिवभक्त उपस्थित राहणार असून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव तळेकरयांनी केले आहे.
Post Views: 13