माळशिरस – दि ५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे महाळुंग,बाभूळगाव,मेडद,माळशिरस,बागेचीवाडी ,संगम,अकलूज,खंडाळी,माळेवाडी,लोंढे मोहीतेवाडी यासह अनेक गावातील शेतकऱ्याचे फळबागा ,शेतीपिक ,घरे यांचे नुकसान झाले आहे तर कण्हेर .रेडे ,भांब या भागात समाधानकारक पाऊस झाला असून तलाठी मंडळ अधिकारी यांनी कृषी सहाय्यक यांचेसह नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी दिल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नुकसानीचा अंदाज येणार असून नुकसान झालेल्या गावात पाहणी सुरु असल्याची माहिती महसूल विभागाचे गणेश खैरे यांनी दिली.
तालुक्यातील काही भागात काल दि ५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी आले.यामध्ये महाळुंग,बाभूळगाव,मेडद,माळशिरस,बागेचीवाडी ,संगम,अकलूज,खंडाळी,माळेवाडी,लोंढे मोहीतेवाडी यासह अनेक गावात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा ,शेतीपिके ,घरांचे नुकसान झाले तर तालुक्याच्य पश्चिम भागातील कण्हेर ,रेडे,भांब ,गिरवी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.नाले,ओढ्यांना थोड्या प्रमाणात पाणी आले आहे. .तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केळी पिक केले आहे .या वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडली आहेत.काही केळी पिकाची वेण झाली आहे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याचबरोबर शेतीपिकाचे नुकसान झाले आहे,चारापिके जमीनदोस्त झाली आहेत.झाडे उन्मळून पडली आहेत.
केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ….वैशाली पाटील ,शेतकरी माळशिरस
माझे तीन एकर क्षेत्रात केळीचे पिक असून सात महिने झाले आहेत .केळीची वेण सुरु झाली या ३० टक्के झाडे उन्मळून पडली आहेत .५० टक्के झाडे वाकली आहे.मोठ्या कष्टाने जोपासलेले पिकाचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी .
विज वितरणचे नुकसान ,शाखा अभियंता शितल डोळे ,माळशिरस
मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळामुळे अनेक झाडे तारावर पडली आहेत.काही झाडांच्या फांद्या तारावर पडल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणचे खांब मोडून पडले आहेत .लाईट पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सरू असून काही भागात रात्रीच विज पुरवठा सुरु केला आहे .
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...