Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

व्हिएतनाममध्ये गारमेंट ऑटोमेशन अभ्यास दौरा; सोलापूरच्या युनिफॉर्म उद्योगाची जागतिक झेप

तरुण भारतbyतरुण भारत
June 8, 2026
in solapur
0
व्हिएतनाममध्ये गारमेंट ऑटोमेशन अभ्यास दौरा; सोलापूरच्या युनिफॉर्म उद्योगाची जागतिक झेप
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – युनिफॉर्म उत्पादन उद्योगाची गुणवत्ता, उत्पादन क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्याच्या उद्देशाने दिनांक १३ जून २०२६ ते १७ जून २०२६ या कालावधीत व्हिएतनाममधील हानोई आणि हो-ची-मिन्ह सिटी येथे विशेष गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जगातील अग्रगण्य शिवणयंत्र उत्पादक कंपनी, जॅक शिलाई मशीन यांनी आयोजित केलेल्या या अभ्यास दौऱ्यात सोलापूरमधील गारमेंट उद्योजकांना जागतिक दर्जाच्या उत्पादन व्यवस्थापन व आधुनिक ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

जॅक कंपनीचे अधिकृत विक्रेते, कोयना शिलाई मशिन्स चे श्री. गणेश सुत्रावे यांच्या विशेष प्रयत्न व पुढाकारा मुळे या दौऱ्यावर जाण्यासाठी या शिष्टमंडळाला संधी मिळाली आहे. या दौऱ्याचे नियोजन करण्यात त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले.

या अभ्यास दौऱ्यात सोलापूरमधील गारमेंट उद्योगाशी संबंधित प्रमुख उद्योजकांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार असून हा दौरा SGMA चे अध्यक्ष श्री. सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. या शिष्टमंडळामध्ये SGMA चे उपाध्यक्ष श्री. रमेश डाकलिया, SGMA चे खजिनदार श्री. श्रीकांत अंबुरे, SGMA चे डायरेक्टर श्री. आनंद झाड, CMAI वेस्टर्न रिजनचे डायरेक्टर श्री. अमितकुमार जैन तसेच असोसिएटेड गारमेंट क्लस्टर फाउंडेशनचे डायरेक्टर श्री. अजय रंगरेज यांचा समावेश आहे.

आज व्हिएतनाम हा जगातील आघाडीच्या वस्त्रोद्योग आणि गारमेंट निर्यातदार देशांपैकी एक असून, चीन आणि बांगलादेशनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गारमेंट निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. अत्याधुनिक ऑटोमेशन, उच्च उत्पादन कार्यक्षमता, जागतिक दर्जाची गुणवत्ता नियंत्रण प्रणाली आणि स्पर्धात्मक उत्पादन खर्च यांच्या बळावर व्हिएतनामने आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योगात विशेष स्थान निर्माण केले आहे. जगातील अनेक नामांकित ब्रँड्सचे उत्पादन व्हिएतनाममध्ये होत असून तेथील कारखाने आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात.

या अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रतिनिधी मंडळाला अत्याधुनिक ऑटोमेटेड उत्पादन प्रणाली, ऍडव्हान्सड मशीन, डिजिटल उत्पादन व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया, उत्पादन क्षमता वाढविण्याच्या आधुनिक पद्धती आणि मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

या दौऱ्यातून मिळणारे ज्ञान, अनुभव आणि तांत्रिक मार्गदर्शन सोलापूरच्या युनिफॉर्म उद्योगासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आधुनिक ऑटोमेशनच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढविणे, गुणवत्तेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करणे यासाठी हा अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सोलापूरच्या युनिफॉर्म उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि प्रगत बनविण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा निश्चितच एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Post Views: 115
Previous Post

आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासन सतर्क 

Next Post

सोलापूरचे तीन जाधव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समितीमध्ये

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूरचे तीन जाधव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समितीमध्ये

सोलापूरचे तीन जाधव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समितीमध्ये

ताज्या बातम्या

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1030274

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!