
पिलीव – माळशिरस तालुक्यात पाच जुन रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला .या वादळी वाऱ्यामुळे अकलूज तसेच माळीनगर परिसरातील केळीच्या बागा, डाळींब, पेरु यासह इतर फळबागा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले.या नुकसानीची माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी शेतकऱ्यांच्या विशेषत संगम, लवंग, बाभुळगाव, माळीनगर गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात बांधावर जाऊन पाहणी केली.तर बाभुळगाव गावातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेची पाहणी करीत असताना बांधावरुनच अगदी शेतकऱ्यांसमोरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन वादळी वाऱ्यामुळे झालेलया नुकसानीची माहीती देत ताबडतोब पंचनामे करणयाचे जिल्ह्य अधिकारी यांना आदेश द्यावेत तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब जास्ती जास्त मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली .तर सदरच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब सकारात्मक प्रतिसाद दिला.पुर्व भागातील शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे फळबागा तसेच इतर पिकांचे ,घराचे ,प्रचंड मोठे नुकसान झाले आहे .यामुळेच बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.अश्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरूनच शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे जिल्ह्य अधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी ठोस पाऊल त्यांनी उचलले आहे .तर ताबडतोब नुकसान ग्रस्त गावातील शेतकऱ्यांचे रितसर पंचनामे करावेत .असे आवाहनही त्यांनी या भागातील शेतकऱ्यांना केले आहे .पंचनामे संदर्भात काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे . नुकसानीमुळे खचुन जाऊ नये शासन तुमच्यासोबत _. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही .यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांनी कोणतेच टोकाचे पाऊल उचलु नये शासन आपल्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी सांगीतले . फोटो _ रामभाऊ सातपुते


















