सोलापूर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटी-पीसीबी गटाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. 24 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली.
महाविद्यालयातील अनुष्का बब्बुर हिने 98.75 पर्सेंटाईल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यासह प्रियंका एडके (98.50), श्रद्धा सावंत (97.73),गुंटुक श्रीलेखा 97.36, कृष्णा रांदिवे (97.16), सुजित अल्लोली (97.07), कार्तिकी गोसकी (96.94), प्रांजली व्हलदुरे (96.64), प्रीती अलविकार (96.41), ज्ञानेश्वरी येलगुंडे (96.16), मयुरी कोल्हापुरे (96.01), राजश्री इंगळे (95.87), रोहन कांबळे (95.60), रुशीकेश मोटे (94.08), श्रेयश शटगार (93.93), शबरीन मुजावर (92.82), अक्षरा यंगलदास (92.54), रोहित होटकर (91.80), ऋतुजा शाहापुरकर (91.42), वेदांत तालीकोटी (91.42), स्वाती माने (91.22), श्रीजीत शिवमूर्ती पाटील (90.90), सौम्या देशपांडे (90.62) आणि आकांक्षा जगताप (90.46) यांनी विशेष यश मिळविले.
याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी 85 पेक्षा अधिक पर्सेंटाईल प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व विश्वस्त ,प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे तसेच सीईटी समन्वयिका सारिका महिंद्रकर यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 31