Saturday, September 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बजरंग दल कार्यकर्त्यांवर सातत्याने पोलिसी, राजकीय तसेच जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलचा अक्कलकोट पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

तरुण भारतbyतरुण भारत
June 11, 2026
in solapur
0
0
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट  :अक्कलकोट तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने पोलिसी, राजकीय तसेच जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी हल्ला करणार्‍या जिहादी घटकांवर अटकेची कार्यवाही लवकरात लवकर करू,अशी ग्वाही दिली.दि.31मे रोजी तालुक्यातील सांगवी(बुद्रुक )येथे कोळेकरवाडी येथील सुनिल ज्ञानेश्‍वर शिंदे व रोहन रामहरी पालकर या दोन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करणेबाबत अक्कलकोट पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली. याबदद्ल हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.केवळ राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हे दाखल करत नाही,आणि त्यानंतर अटकेची कारवाई करत नाही,याचा निषेध केला जात आहे.
 बजरंग दलाचे कार्यकर्ते बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण वर्गासाठी पुणे जवळील कामशेत येथे गेले होते.प्रशिक्षणावरुन गावाकडे जात असताना सांगवी(बुद्रुक)येथे 16 ते 17 जिहाद्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केला.या घटनेची खबर ना पोलिसांनी घेतली ना फिर्याद दाखल करून घेतली.अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिस अधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना उलट सज्जड दम देत,उपदेशाचे डोस देवून विहिंप बजरंग दलाचे काम कशाला करता,असा सवाल केला.दि.31 मे रोजी घडलेल्या घटनेनंतर चार दिवसांनी गुन्हे दाखल झाले.त्यानंतर या टोळीचा म्होरक्या सद्दाम शेरीकर व त्याचे अन्य प्रमुख साथीदारांवर अटकेची कारवाई होत नाही,याचा जाब विचारण्यासाठी बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन,विहिंप विभाग मंत्री विजयकुमार पिसे,जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे,बजरंग दल जिल्हा संयोजक अभय कुलथे,प्रखंड मंत्री मेजर बालाजी राजपूत व प्रखंड संयोजक मदन राठोड यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.
ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर येथे महाआरती करुन धडक मोर्चास प्रारंभ झाला. प्राणघातक हल्ल्यानंतर सात दिवस उलटल्यानंतरही जिहाद्यांच्या पोलीस प्रशासनाकडून मुसक्या आवळण्याचे काम झाले नाही.याबद्दल बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांना जाब विचारला.तसेच तात्काळ अटकेची कारवाई करा,अन्यथा अशा जिहाद्यांचा बंदोबस्त करावा लागेल,असा इशारा दिला. दरम्यान विहिंप,बजरंग दल व ग्रामस्थ यांची बैठक प्रांत संयोजक नितीन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळेकरवाडी येथे पार पडली.ग्रामस्थांनी एकत्रित राहून जिहादी शक्तींना रोखले पाहिजे,असे आवाहन महाजन यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. विभाग मंत्री विजयकुमार पिसे,जिल्ह्याचे मंत्री जयदेव सुरवसे,जिल्हा सहमंत्री विष्णू जगताप, बापूसाहेब कदम,बाबू गिरगल,बजरंग दल जिल्हा संयोजक अभय कुलथे, अक्कलकोट चे प्रखंड मंत्री बालाजी राजपूत, बजरंग दलाचे संयोजक मदनकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत दोन्ही बजरंगीच्या कुटुंबियांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धीर देवून तुमच्या पाल्यांना नेटाने धर्मकार्याचे ईश्‍वरी काम करु द्या, त्यांच्या पाठीमागे विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल खंबीरपणे उभा आहे,अशी ग्वाही नितीन महाजन यांनी दिली.
  पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा दाखल झाला.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्यासमवेत बजरगं दलाचे कार्यकर्ते यांनी पोलीस कारवाईबाबत आग्रह धरला.या दरम्यान सुमारे दीड तास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या समोरील गेटवर श्रीराम भक्त व बजरंगी यांनी भजन,भक्तीगीते,देशभक्ती घोषणानी पोलीस ठाण्याचा परिसर दुमदुमून गेला होता.
 अक्कलकोट येथील धडक मोर्चात सिध्देश्‍वर गोकावी,रवि बोल्ली,चंद्रकांत कुलकर्णी,प्रवीण जिल्ला,अमित सारोळकर,अनिल कोळी,विश्‍वनाथ जवळगे,अ‍ॅड.गोविंद शिंदे,माणिक रेड्डी,अदित्य चिप्पा,प्रशांत गायकवाड,सागर सिध्दुल,नरेश सिध्दुल,दत्तात्रय कोंतम,प्रज्वल बासुतकर,अक्कलकोट प्रखंड मंत्री मेजर बालाजी राजपूत,बजरंग दल अक्कलकोट प्रखंडाचे संयोजक मदनकुमार राठोड,अक्कलकोटचे बजरंगी ऋषीकेश लोणारी, सहसंयोजक सुनिल पाटील,समर्थ अडवीतोटे,सांगवी (बुद्रक) चे बंजरगी योगेश रेड्डी,परशुराम रेड्डी,दादा भोसले,प्रकाश मोरे,लखन अवटे,कोळेकरवाडीचे सुनिल शिंदे,रोहन पालकर,रावसाहेब मोरे,सूरज खरात व ग्रामस्थ तसेच काळेगावचे पवन चव्हाण,राजेश राठोड,गोसावी वस्तीचे समर्थ लवटे,किणीमोडचे राम चव्हाण,काजीकणबसचे अभय वाले,आलूरचे शिवानंद कलशेट्टी,जेऊरे भालके,बादोलेचे व्यंकट सलगरे,सिध्दाराम बडुरे,पानमंगरूळचे सिद्धाराम हिरेमठ,या प्रमुख पदाधिकार्‍यांसह चपळगाव व बोरोटी येथील कार्यकर्ते धडक मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
Post Views: 338
Previous Post

देवाच्या दरबारात विषमता नाही , राजा आणि सामान्य भक्ताला एकच न्याय : भागवत महाराज शिरवळकर 

Next Post

साउथ सोलापूर आपटे’ संघास विजेतेपद; मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट उपविजेता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

साउथ सोलापूर आपटे’ संघास विजेतेपद; मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट उपविजेता

ताज्या बातम्या

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

September 11, 2026
कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

September 11, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

September 11, 2026

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

September 11, 2026

विद्यार्थ्यांच्या हातून घडणार पर्यावरणपूरक गणराय

September 11, 2026
सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

September 11, 2026
महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

September 11, 2026
गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

September 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1193765

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!