
सोलापूर – येथील रेल्वे मैदानावर पार पडलेल्या ७९ व्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत ‘साउथ सोलापूर आपटे’ संघाने अंतिम सामन्यात मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर संघाचा ३ गडी राखून पराभव करत मानाचा फिरता चषक आणि ढाल स्वतःकडे राखली. कै. सुरेश मालप यांच्या स्मरणार्थ सुदेश व सुनील मालप यांनी ही आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केली होती.
रेल्वे मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर रेल्वेचे ए.डी.आर.एम. अंशू्मली कुमार आणि क्रीडाधिकारी आदित्य त्रिपाठी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सचिव उल्हास बागेवाडी, रेल्वे चिकित्सा अधिकारी डॉ. मंजुनाथ, प्रिसिजनचे पीआरओ विनायक दूधगी, साबरी कन्स्ट्रक्शनचे जेद शेख, आयपीएल खेळाडू अर्शिन कुलकर्णी, तसेच मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी किशोर पिल्ले व खजिनदार दत्ता वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्यात दया नवले व मजर मंगोली यांनी पंच म्हणून, तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राजा पटेल यांनी केले.
संक्षिप्त धावफलक:
- मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर: २० षटकांत ८ बाद १३२ धावा. (अभिषेक पवार नाबाद ५४, जसन सिंग २६, पार्थ लोंढे १७. गोलंदाजी: बाळकृष्ण काशिद २/१४, अर्शिन कुलकर्णी २/३२).पराभूत विरुद्ध
- साउथ सोलापूर आपटे: १८.३ षटकांत ७ बाद १३३ धावा. (चेतक गोरे नाबाद ३८, निरंजन कदम २४, संकीर्ण पाटील २३, नारायण डोके नाबाद २३. गोलंदाजी: आशिष आईवळे ३/२०, लखन गावडे ३/३४).
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक विजेते:
- विजेता संघ: साउथ सोलापूर आपटे (२१ हजार रुपये व चषक)
- उपविजेता संघ: मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर (११ हजार रुपये व चषक)
- मालिकावीर : बाळकृष्ण काशीद (साऊथ सोलापूर) – पंधराशे रुपये व चषक
- सामनावीर : नारायण डोके – पाचशे रुपये (वैभव इराबत्ती यांच्याकडून) व चषक
- उत्कृष्ट फलंदाज: विवेक अंनची (मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी) एक हजार रुपये, चषक व प्रविण देशेट्टी यांच्याकडून बॅट.
- उत्कृष्ट गोलंदाज: बाळकृष्ण काशीद (साऊथ सोलापूर) – एक हजार रुपये, चषक व ‘डी स्पोर्ट्स’ वासुदेव दोरणाल यांच्याकडून शूज.
- उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: संजय राठोड (मध्य रेल्वे इन्स्टिट्युट) – पाचशे रुपये व ट्रॉफी.
सहकार्य व मैदानी कर्मचाऱ्यांचा सत्कार
स्पर्धेला वैयक्तिक पारितोषिके देऊन सहकार्य केल्याबद्दल सुदेश मालप, राजा पटेल, वासुदेव दोरनाल, वैभव इराबत्ती, प्रवीण देशेट्टी, अतुल बांडीवाडीकर आणि शोएब शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून मैदान तयार करण्यासाठी मेहनत घेणारे विक्रांत पवार, राजा पटेल, लियाकत शेख, अंबादास तोरा, श्रावण चिठ्ठयालकर आणि मैदानी कर्मचारी पंडित गायकवाड, सुमित भेंडे, कोळी, सुनील गादे, बिराप्पा बंडागर व सचिन गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला.























