अक्कलकोट :अक्कलकोट तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने पोलिसी, राजकीय तसेच जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी हल्ला करणार्या जिहादी घटकांवर अटकेची कार्यवाही लवकरात लवकर करू,अशी ग्वाही दिली.दि.31मे रोजी तालुक्यातील सांगवी(बुद्रुक )येथे कोळेकरवाडी येथील सुनिल ज्ञानेश्वर शिंदे व रोहन रामहरी पालकर या दोन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करणेबाबत अक्कलकोट पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली. याबदद्ल हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.केवळ राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हे दाखल करत नाही,आणि त्यानंतर अटकेची कारवाई करत नाही,याचा निषेध केला जात आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण वर्गासाठी पुणे जवळील कामशेत येथे गेले होते.प्रशिक्षणावरुन गावाकडे जात असताना सांगवी(बुद्रुक)येथे 16 ते 17 जिहाद्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केला.या घटनेची खबर ना पोलिसांनी घेतली ना फिर्याद दाखल करून घेतली.अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिस अधिकार्यांनी कार्यकर्त्यांना उलट सज्जड दम देत,उपदेशाचे डोस देवून विहिंप बजरंग दलाचे काम कशाला करता,असा सवाल केला.दि.31 मे रोजी घडलेल्या घटनेनंतर चार दिवसांनी गुन्हे दाखल झाले.त्यानंतर या टोळीचा म्होरक्या सद्दाम शेरीकर व त्याचे अन्य प्रमुख साथीदारांवर अटकेची कारवाई होत नाही,याचा जाब विचारण्यासाठी बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन,विहिंप विभाग मंत्री विजयकुमार पिसे,जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे,बजरंग दल जिल्हा संयोजक अभय कुलथे,प्रखंड मंत्री मेजर बालाजी राजपूत व प्रखंड संयोजक मदन राठोड यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.
ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर येथे महाआरती करुन धडक मोर्चास प्रारंभ झाला. प्राणघातक हल्ल्यानंतर सात दिवस उलटल्यानंतरही जिहाद्यांच्या पोलीस प्रशासनाकडून मुसक्या आवळण्याचे काम झाले नाही.याबद्दल बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांना जाब विचारला.तसेच तात्काळ अटकेची कारवाई करा,अन्यथा अशा जिहाद्यांचा बंदोबस्त करावा लागेल,असा इशारा दिला. दरम्यान विहिंप,बजरंग दल व ग्रामस्थ यांची बैठक प्रांत संयोजक नितीन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळेकरवाडी येथे पार पडली.ग्रामस्थांनी एकत्रित राहून जिहादी शक्तींना रोखले पाहिजे,असे आवाहन महाजन यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. विभाग मंत्री विजयकुमार पिसे,जिल्ह्याचे मंत्री जयदेव सुरवसे,जिल्हा सहमंत्री विष्णू जगताप, बापूसाहेब कदम,बाबू गिरगल,बजरंग दल जिल्हा संयोजक अभय कुलथे, अक्कलकोट चे प्रखंड मंत्री बालाजी राजपूत, बजरंग दलाचे संयोजक मदनकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत दोन्ही बजरंगीच्या कुटुंबियांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धीर देवून तुमच्या पाल्यांना नेटाने धर्मकार्याचे ईश्वरी काम करु द्या, त्यांच्या पाठीमागे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल खंबीरपणे उभा आहे,अशी ग्वाही नितीन महाजन यांनी दिली.
पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा दाखल झाला.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्यासमवेत बजरगं दलाचे कार्यकर्ते यांनी पोलीस कारवाईबाबत आग्रह धरला.या दरम्यान सुमारे दीड तास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या समोरील गेटवर श्रीराम भक्त व बजरंगी यांनी भजन,भक्तीगीते,देशभक्ती घोषणानी पोलीस ठाण्याचा परिसर दुमदुमून गेला होता.
अक्कलकोट येथील धडक मोर्चात सिध्देश्वर गोकावी,रवि बोल्ली,चंद्रकांत कुलकर्णी,प्रवीण जिल्ला,अमित सारोळकर,अनिल कोळी,विश्वनाथ जवळगे,अॅड.गोविंद शिंदे,माणिक रेड्डी,अदित्य चिप्पा,प्रशांत गायकवाड,सागर सिध्दुल,नरेश सिध्दुल,दत्तात्रय कोंतम,प्रज्वल बासुतकर,अक्कलकोट प्रखंड मंत्री मेजर बालाजी राजपूत,बजरंग दल अक्कलकोट प्रखंडाचे संयोजक मदनकुमार राठोड,अक्कलकोटचे बजरंगी ऋषीकेश लोणारी, सहसंयोजक सुनिल पाटील,समर्थ अडवीतोटे,सांगवी (बुद्रक) चे बंजरगी योगेश रेड्डी,परशुराम रेड्डी,दादा भोसले,प्रकाश मोरे,लखन अवटे,कोळेकरवाडीचे सुनिल शिंदे,रोहन पालकर,रावसाहेब मोरे,सूरज खरात व ग्रामस्थ तसेच काळेगावचे पवन चव्हाण,राजेश राठोड,गोसावी वस्तीचे समर्थ लवटे,किणीमोडचे राम चव्हाण,काजीकणबसचे अभय वाले,आलूरचे शिवानंद कलशेट्टी,जेऊरे भालके,बादोलेचे व्यंकट सलगरे,सिध्दाराम बडुरे,पानमंगरूळचे सिद्धाराम हिरेमठ,या प्रमुख पदाधिकार्यांसह चपळगाव व बोरोटी येथील कार्यकर्ते धडक मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
Post Views: 50