मुंबई : भारतातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी ‘टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेड’ने ऑक्टोबर २०२६ या महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्तम कामगिरी करत एकूण ७५,४२६ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत (ऑक्टोबर २०२५) झालेल्या ६१,२९५ वाहनांच्या विक्रीच्या तुलनेत ही २३% ची मजबूत वार्षिक वाढ दर्शवते.
देशांतर्गत बाजारात कंपनीने २१% वाढीसह ७३,८९४ वाहनांची विक्री नोंदवली आहे.कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाने या महिन्यातही आपली नेत्रदीपक घोडदौड कायम ठेवली. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण १६,२४४ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली. ऑक्टोबर २०२५ मधील ९,२८६ वाहनांच्या तुलनेत यात ७५% ची मोठी वाढ झाली आहे.
याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवासी वाहनांच्या निर्यातीत तब्बल ८५२% ची प्रचंड वाढ पाहायला मिळाली असून एकूण १,५३२ वाहनांची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत ऑक्टोबर २०२५ मध्ये १६१ वाहनांची निर्यात करण्यात आली होती.



















