
पिलीव – पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पार्क करंडक क्रिकेट स्पर्धेचा फायनल अतिशय रोमांचक व प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. या स्पर्धेचा फायनल सामना बचेरी ता.माळशिरस येथील श्रीराम 11 या संघाने जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला.सालाबाद नुसार स्पार्क क्रिकेट ग्राउंड पुणे चे मालक योगेश तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पार्क करंडक हि क्रिकेट स्पर्धा पुणे येथे भरवली जाते.असंख्य क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात.शेवटच्या फायनल सामन्यात अतिशय रोमांचक व चुरशीच्या लढतीत बचेरी तालुका माळशिरस येथील श्रीराम 11 या संघाने विजय मिळवत आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले. या संघाचे कर्णधार जगदीश गोडसे, उपकर्णधार गणेश पाटील, खजिनदार गणेश देशमुख, विस्फोटक ओपनर बॅटसमन सुहास चव्हाण, रोहित पाटील, अनिल यादव,समाधान कुंभार,रुषीकेश सावळजकर,रुत्वीक पाटील,वेदराज गोडसे,प्रशांत पाटील,अमर दडस सह आदी खेळांडुंनी आपल्या उत्कृष्ट कामगीरीच्या जोरावर विजय खेचून आणत प्रेक्षकांची मने जिंकली. बचेरी सारख्या ग्रामीण भागातील संघाने पुणे येथे हा करंडक जिंकल्यामुळे गावगाड्यात संघाचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
Post Views: 13