अक्कलकोट – श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतील खासबाग गल्ली परिसरातील एका किराणा दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला ‘ यामध्ये तब्बल ६६ हजार १२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. यामुळे शहरामध्ये खळबळ माजली आहे . या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई शुक्रवार १२ जून रोजी दुपारी २ वाजता झाली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सोलापुर कार्यालयातील उत्कर्षा मुकुंद एखंडे (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित, आरोपी आप्पासाहेब ग्यानबा धुमाळ (वय ५५, रा. खासबाग गल्ली, अक्कलकोट) याच्या विरोधात अक्कलकोट उतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ जून शुक्रवार रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खासबाग गल्ली येथील माउली किराणा स्टोअर्स येथे तपासणी केली. तपासणीत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या विविध प्रकारच्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाचा विक्रीसाठी साठा केल्याचे आढळून आले. विविध प्रकारचे पानमसाला, तंबाख, शॉट लक्झरी च्विंग तंबाखू असा एकूण ६६ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कोळी करीत आहेत.
Post Views: 20