सांगोला – शिवणे (ता.सांगोला) येथील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांच्या शेतात प्रथमच आंब्याचे भरघोस फळ हाती आले. या पहिल्या फळाची बाजारात विक्री न करता त्यांनी १९७५ सालच्या आपल्या शालेय मित्रमंडळींना मनसोक्त आंबा खाण्यासाठी आमंत्रित केले. या स्नेहमेळाव्यात मित्रांनी नैसर्गिकरित्या पिकलेल्या रसाळ आंब्यांचा आस्वाद घेतला. यावेळी सर्वांनी शालेय जीवनातील गप्पा, जुने किस्से, आठवणी आणि एकमेकांची केलेली चेष्टा-मस्करी यामुळे वातावरण कमालीचे आनंददायी बनले होते. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन प्रा.राजेंद्र ठोंबरे, दिपक चोथे यांनी केले. याप्रसंगी नारायण चव्हाण, जब्बार मुलाणी, नंदकुमार ठोंबरे, मोहन माळी, शंकर डोंबे आणि विलास पाटील उपस्थित होते. वयाच्या उत्तरार्धातही शालेय मित्रांनी एकत्र येत अनुभवलेला हा जिव्हाळ्याचा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
Post Views: 12