पंढरपूर – पंढरपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील आंबे – राझंणी रोडवर अवैध वाळूच्या दोन हायवा टिप्पर आणि दोन टेम्पो अशा एकूण चार वाहनांवर कारवाई करून एकूण ५५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईची सविस्तर माहिती अशी की, आंबे ते राझंणी या रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे अशी माहिती मिळाल्याने पंढरपूर उपविभागाचे सहायकपोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळूवरती कारवाईकरण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी मौजे आंबे राझंणी कडे जाणारे रोडवर आणि गोपाळपूर येथे रेडकरून त्या ठिकाणी दोन हायवा टिप्पर आणि दोन टेम्पो असेएकूण चार वाहने जप्त केली. या चार जप्त केलेल्या वाहनांमध्ये ११ ब्रासअवैधरित्या चोरलेली वाळू आणि चार वाहने असा एकूण ५५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे दोन हायवा टिपर व दोन टेम्पो असे चारही गाड्यांचे चालक आणि मालक पप्पू शिंदे, रामा पुजारी, दत्ता भोसलेयांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता बीएनएस कायदाकलम ३०३ , ३०५ अन्वये गुन्हादाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल परचुरे कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले,पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक रणदिवे, सहाय्यक फौजदार जनार्दन करे, पोलीस हवालदार दीपक भोसले,मंगेश रोकडे, पोलीस हवालदार साळुंखे, विजयकुमार आवटी, संजय गुटाळ (चालक), पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, आसन नदाफ, महेश गोडसे, रामभाऊ चाटे यांच्या पथकाने केली आहे.
Post Views: 6