
मंगळवेढा – ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांच्या वतीने आवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चौगुले, डॉ.धनश्री केंदुळे,डॉ.चौखंडे यांनी सुमारे 150 कामगार,अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली.यामध्ये 100 डेज कॅम्पेन मोहिमेअंतर्गत क्षयरुग्ण शोधणे, कुष्ठरोग तपासणी, एचआयव्ही तपासणी व समुपदेशन,मधुमेह, रक्तदाब तपासणी व इतर आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या.यामध्ये नवीन मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या रुग्णांचे निदान करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक आबासो नागणे,वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक प्रल्हाद नाशिककर, कुष्ठरोग तंत्रज्ञ वीरभद्रेश्वर दसरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वाती शिंदे,औषध निर्माण अधिकारी विवेकानंद कसबे ,अविनाश पट्टणशेट्टी, अधिपरिचारिका रोहिणी तीर्थकर,एनजीओच्या प्रतिभा माळी,प्रवीण डांगे उपस्थित होते. या शिबिरास आवताडे स्पिनर्स प्रा. लिमिटेडचे युनिट हेड सुनील कामठे, स्पिनिंग मॅनेजर शीतल उपाध्ये ,प्रोडक्शन मॅनेजर विनायक नलवडे,अकाउंटंट दत्तात्रय भोसले, लेबर ऑफिसर अनिल कलपगार, टाईम कीपर रोहित सावंत यांचे सहकार्य लाभले.
Post Views: 23