
सोलापूर -राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या 352 व्या स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा पुतळ्याजवळील नियोजित राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळ जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांचे शहरात कुठेच स्मारक किंवा पुतळा नाही त्यामुळे अभिवादन करताना शिवभक्तांना अडचण येत आहे राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकका साठी सोलापूर चे पालकमंत्री व मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांनी भरघोस निधी ची तरतूद करावी आणि लवकरात लवकर सोलापूर शहरांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, विक्रम वानकर, शेखर भोसले, विशाल साळुंखे, विकास तीरेकर, संतोष सुरवसे, दत्तात्रय डिंगणे, मनीषा कोळी, सोनाली सगर, अनिल जोशी, मनोज पवार आदी उपस्थित होते.





















