पंढरपूर – कोरिडोर अरिष्ट निवारणार्थ, अधिक मासानिमित्त, हिंदुमहासभा भवनात सप्तदिनात्मक पुरुषोत्तम याग तथा विष्णुयाग संपन्न झाला. ९ जून रोजी सुरू झालेल्या या यज्ञाची सांगता १५ जून रोजी पुर्णाहुतीने झाली.
या यज्ञाचे वेळी येथील शुक्ल यजुर्वेदी काण्वशाखीय वेदपाठशालेने यज्ञीय पौरोहित्य व कर्मकांड पार पडले. विविध जातीय सुमारे चाळीस संभाव्य कारिडोर
बाधित दांपत्यांनी यज्ञात प्रत्यक्ष सहभाग घेतला. सकाळी रोज सात ते साडेअकरा या वेळात हवन तर सायंकाळी वेगवेगळ्या महिला भजनी मंडळांचे भजन सादर होत होते.
सोमवारी यज्ञ सांगतेची अवभृत स्नानाची जंगी दिंडी मिरवणूक काढण्यात आली. चंद्रभागा मातेला साडीचोळी अर्पण करुन आहुती देवून वंदन करण्यात आले. बराच बाधित समाज उपस्थित होता.
शासनाकडे मागणी, आंदोलन याबरोबरच ईश्वराकडेच मागणी करण्यासाठी या विष्णुयागाचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी काल्याचे अभंग म्हणून मोठ्या प्रमाणात काला व शिरा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. सबंध अधिक महिन्यात हा सर्वात मोठा यज्ञ पंढरीत संपन्न झाला.
Post Views: 11