पंढरपूर -अनियंत्रित एमआरपीमुळे ग्राहकांची सर्रास लूट केली जाते त्यासाठी वस्तुंवर उत्पादन मुल्य छापावे या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ग्राहक पंचायतीतर्फे गल्ली ते दिल्ली असे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले .
प्रत्येक तहसील कार्यालय ते नवी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर मैदान येथील सत्याग्रहात पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.
पंढरपूर तहसील कार्यालयासमोरील सत्याग्रह आंदोलनात जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,कोषाध्यक्ष सागर शिंदे,जिल्हा सदस्य संतोष उपाध्ये,पांडुरंग अल्लापूरकर, तालुका सहसचिव आझाद अल्लापूरकर,तालुका कार्यकारिणी सदस्य मंगेश देशपांडे,शशिकांत सुगंधी,तेजस फडे,अमोल अभंगराव,किशोर शिंदे,शहाजी जाधव,शाम तापडिया, इ.सहभागी झाले होते.
आंदोलनासाठी प्रांत सहसचिव दीपक इरकल,सदस्य विनोद भरते, सुभाष सरदेशमुख यांचे मार्गदर्शनाखाली तालुका सचिव महेश भोसले, सुमित पारखे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान सत्याग्रह करून पंढरपूर प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देण्यात आले.
Post Views: 13