सांगोला – महाविद्यालय, सांगोला येथील बी.एस्सी.भाग-३ शाखेची विद्यार्थिनी दिशा दादासो जाधव हिने राष्ट्रीय स्तरावरील जेएएम परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून देशातील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरथकल, कर्नाटक येथे एम.एस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आहे. तिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत १२९५ वा क्रमांक मिळविला असून बी.एस्सी.भाग-३ परीक्षेत ९२.३६ टक्के गुण संपादन केले आहेत. दिशा जाधवचे प्राथमिक शिक्षण उत्कर्ष प्राथमिक विद्यालय सांगोला, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज सांगोला येथे झाले. त्यानंतर तिने सांगोला महाविद्यालयात बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सांगोला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी भौतिकशास्त्र विभागाच्या डॉ. चित्रा जांभळे, प्रा.डॉ.रमेश बुगड, प्रा.डॉ.तानाजी माने उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, खजिनदार नागेश गुळमिरे यांनी दिशा जाधवचे अभिनंदन केले.