Wednesday, September 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“माहितीचा वार शनिवार’ शिक्षकांना दिलासा; दररोजच्या अहवालांच्या कटकटीतून सुटका

तरुण भारतbyतरुण भारत
June 19, 2026
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सतत विविध माहिती, अहवाल आणि आकडेवारी सादर करण्याच्या कामातून मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महत्त्वपूर्ण निर्णय घेत शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व प्रकारची माहिती आठवड्यातून केवळ एकदाच, म्हणजे शनिवारी वरिष्ठ कार्यालयांना सादर करावी लागणार आहे.
         शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी यासंदर्भातील निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाला दिले आहेत. यानिर्णयामुळे शिक्षकांचा वेळ अहवाल आणि नोंदी भरण्याऐवजी प्रत्यक्ष अध्यापनासाठी वापरला जाणार आहे.
            शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी शाळास्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली असून, यूडायस आणि सरल यांसारख्या विविध प्रणालींचे एकत्रीकरणही करण्यात आले आहे. याशिवाय पीएम पोषण योजनेतील नोंदवही व्यवस्थेचे सुलभीकरण करण्याचे प्रयोगही यशस्वी ठरले आहेत.
कोट
अहवाल शनिवारी सादर करण्याची मुभा
विद्यार्थ्यांची उपस्थिती, पीएम पोषण योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या तसेच विद्यार्थी सुरक्षा, विधिमंडळ कामकाज आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित माहिती ही मात्र दररोज अद्ययावत ठेवावी लागणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे अहवाल शनिवारी सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
 – कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
चौकट
शिक्षकांनी व्यक्त केले समाधान
‘माहितीचा वार शनिवार’ हा उपक्रम कोल्हापूर, गडचिरोली, बीड आणि नंदुरबार जिल्ह्यांतील निवडक केंद्रांमध्ये पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात आला होता. या प्रयोगात ९० टक्के शिक्षकांनी समाधान व्यक्त केले, तर ९६.६ टक्के शिक्षकांनी अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध झाल्याचे नमूद केले.
चौकट
हा निर्णय उपयुक्त
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना प्रशासकीय कटकटीतून दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय शिक्षण व्यवस्थेसाठी सकारात्मक आणि उपयुक्त पाऊल मानला जात आहे.
Post Views: 81
Previous Post

काँरिडोर विरोधी तिर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी (इचगांवकर) यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल…

Next Post

सांगोला महाविद्यालयातील दिशा जाधवची एनआयटी कर्नाटकमध्ये एम.एस्सी फिजिक्ससाठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला महाविद्यालयातील दिशा जाधवची एनआयटी कर्नाटकमध्ये एम.एस्सी फिजिक्ससाठी निवड

ताज्या बातम्या

सोलापुरात भरणार रोजगार कुंभ मेळावा #viral #solapurnews #aajsolapur #news

September 16, 2026

गोकुळ शुगरच्या तिघांना चेन्नई पोलिसांनी केली अटक

September 16, 2026

यूपीआय वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी #viral #news #marathinews

September 16, 2026

भाजपाचे किसान मोर्चा जाणार शेताच्या बांधपर्यंत #viral #solapurnews #aajsolapur #news

September 16, 2026

विडी कामगारांच्या कच्च्या मालातील वजन चोरीला आळा घाला आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसवा – कॉ.आडम मास्तर

September 16, 2026

असे करा गौराईचे आवाहन अन पूजन मोहन दातेंची माहिती #solapur #ganeshutsav

September 16, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

September 15, 2026
जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

September 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1216689

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!