सोलापूर – रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे नर्मदा परिक्रमा माझे अनुभव या विषयावर व्याख्यान शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी सायं. ६:३० वाजता वक्ते ओमप्रकाश लाहोटी यांचे आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान हॅच फ्रीमेसन्स हॉल, रंगभवन जवळ, येथे आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ओमप्रकाश लाहोटी यांनी नुकतीच पवित्र व आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. या प्रसंगी ते आपल्या नर्मदा परिक्रमेतील प्रेरणादायी अनुभव, संस्मरणीय प्रसंग आणि या आध्यात्मिक यात्रेतून मिळालेले जीवनमूल्यपूर्ण संदेश आपल्यासमोर मांडणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रमास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रो. धनश्री केळकर अध्यक्ष यांनी केले आहे.




















