Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

तरुण भारतbyतरुण भारत
June 19, 2026
in solapur
0
संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –   राज्यात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा काटेकोर व प्राधान्याने वापर करण्यात यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार राज्यात सध्या एल निनो प्रभावामुळे मान्सूनला विलंब होत आहे.त्यामुळे गावात संभाव्य गंभीर पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.त्यासाठी जिल्हयातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.
            त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी राज्य व जिल्हास्तरावरून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अत्यंत काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.गावात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी व जनजागृती मोहीम राबवावी, ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध जलस्रोत, साठा व पाणी पुरवठा स्थितीचे नियमित शुद्धीकरण करावे ,पाणी पुरवठा योजना, विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोत कार्यान्वित स्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी, पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, बागांना पाणी देणे इत्यादी गैर-प्राधान्य कामांसाठी टाळण्याबाबत सूचना देण्यात द्याव्यात, पाणी पुरवठा योजनांची गळती, अनधिकृत नळजोडणी व पाण्याची चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
           पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलांची नियमित भरणा करावा व देखभाल दुरुस्ती च्या कामांची वेळेत पूर्तता करून योजना अखंडित सुरू राहतील याची दक्षता घ्यावी , टंचाईची शक्यता असलेल्या गावांमध्ये पर्यायी विहिरी, बोअरवेल, अधिग्रहण इ. जलस्रोत उपलब्धतेची पूर्वतयारी करावी, जलसंधारण, पावसाचे पाणी साठवणूक व भूजल पुनर्भरणाबाबत ग्रामस्तरावर जनजागृती करावी, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी करून नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, पाणी टंचाईसंदर्भातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून समन्वय ठेवण्यात यावा, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील उपलब्ध साठा ३० दिवसांपेक्षा कमी असल्यास त्याबाबतचा अहवाल तात्काळ जिल्हा प्रशासनास सादर करण्यात यावा अशी सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली आहे.
      दरम्यान गावातील शासकीय कार्यालये, शाळा,अंगणवाडी, महाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्थांमध्ये पाणी बचतीबाबत विशेष सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्यास वितरणामध्ये पारदर्शकता ठेवून नियमित नोंदी ठेवाव्यात व जीपीएस निरीक्षणाद्वारे नियंत्रण ठेवावे, पाणीटंचाई निवारण्यासाठी महसूल, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा व इतर संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
गावातील नागरिकांना दवंडी देऊन “पाणी आहे तितकेच वापरा, पाणी वाचवा” या संदेशाद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी जेणेकरून वरील सूचनांचे काटेकोर पालन करून पिण्याच्या पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करावा व संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करता येईल अशा लेखी सुचना सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आल्या आहेत असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्र.कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी सांगीतले.
Post Views: 60
Previous Post

धरण आणि नदीत पाणी असूनही शेतकऱ्यांचा गळा घोटणार का?

Next Post

रोटरी क्लब तर्फे नर्मदा परिक्रमेवर व्याख्यान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रोटरी क्लब तर्फे नर्मदा परिक्रमेवर व्याख्यान

ताज्या बातम्या

इंडियन रेल्वे केटरिंगIRCTC टुरिझम कार्पोरेशनने सुरु केली नवीन वेबसाईटची बीटा आवृत्ती #viral

July 16, 2026

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा धर्मादाय संस्थांना पुढे येण्याचे आवाहन #solapurnews

July 16, 2026

धनंजय मुंढे मंत्री व्हावे म्हणून केली लाडूंची तुला #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 16, 2026

शेगावीच्या श्री गजाननाच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

विठ्ठलाला दिल्या अहिल्यानगरच्या भक्तांने सोन्याच्या अर्धा किलोच्या पादुका #viral #marathinews

July 16, 2026

पंढरपूरात पुन्हा एफडीएची धडक कारवाई #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

अवघड आहे वृद्ध आई वडीलानाच काढले घराबाहेर #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979609

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!