
सांगोला – तालुक्यातील राजुरी गावचे ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिर येथील लक्ष्मीदेवीच्या दगडी मुर्तीवरील सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना शुक्रवार दि.१९ जून रोजी रात्री घडली होती. सदर घटना घडल्यानंतर रविवार दि.२१ जून रोजी राजुरी येथील लक्ष्मीदेवी मंदिर येथे लक्ष्मीदेवीची अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. यावेळी दिलीप दबडे, दत्ता पाटील, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब बिसले, नामदेव बंडगर व संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत देवीचा गजर व नामस्मरण करण्यात आले. सदर कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला.
Post Views: 9