सोलापूर : शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने विभागीय कार्यालय क्रमांक ५ व ६ मधील प्रभागांचा सविस्तर आढावा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या बैठकीत नवीन जलकुंभ, एमबीआर, मुख्य व वितरण जलवाहिन्या तसेच आवश्यक जागांच्या उपलब्धतेबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसेविका वृषाली चालुक्य, वनिता पाटील, सुमन चाबुकस्वर, अनिशा मोगल, वैशाली भोपळे, नगरसेवक अहजर हुंडेकरी, किसन जाधव, सत्यजित गायकवाड, राजशेखर पाटील, ऋषिकेश म्हेत्रे, चैत्राली गायकवाड, सोनाली गायकवाड, शिवराज गायकवाड, अर्जुन गायकवाड, महादेव गवळी, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी प्रकाश सांवत, उमर बागवान तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित पाण्याच्या टाक्या व एमबीआरसाठी महापालिका, शासन अथवा खाजगी जागा उपलब्ध आहेत का, याची माहिती तातडीने संकलित करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी नियोजनपूर्वक कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.बैठकीत जुन्या व जीर्ण पाण्याच्या टाक्यांची पुनर्बांधणी, नवीन टाक्यांची क्षमता, लाभक्षेत्र, नवीन व बदलण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांबाबत लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात आली. शहरातील कोणताही भाग योजनेपासून वंचित राहू नये व सर्व नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळावा, यावर भर देण्यात आला.
Post Views: 19