पंढरपूर – तालुक्यातील खर्डी येथे असलेल्या खासगी तत्वावरील सिताराम साखर कारखान्याचे परिसरात प्रदूषण होत असल्यामुळे शेतीचे नुकसान होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे प्रदूषण थांबवावे, या मागणीसाटी खर्डी येथील ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसापासून कारखान्याच्या गेटसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र याकडे कारखाना प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्यामुळे ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिताराम साखर कारखान्यामध्ये तयार झालेले दूषित पाणी परिसरात सोडण्यात येत आहे. यामुळे परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले असून जनावरे पाणी पीत नाहीत. तसेच कारखान्यांमध्ये असलेली राख व बगॅस उडत आहे.
यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी गेल्या चार वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र याकडे कारखाना प्रशासन दर्लक्ष करत असल्याने गेल्या चार दिवसापासून खर्डी येथील ग्रामस्थांनी सिताराम कारखाना गेट समोर अमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र याची दखल कारखाना प्रशासनाने घेतली नसल्यामुळे खर्डी ग्रामस्थातून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Post Views: 15