
कुर्डूवाडी – कुर्डूवाडी नगरपालिका अंतर्गत चालत असलेल्या शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्यासाठी गरजेच्या व आवश्यक असणा-या बाथरूम,सौचालये व मुतारी प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील बांधून अथवा दुरूस्त करून मीळत नसल्याने दस्तुरखुध्द शिक्षण समिती सभापती संजय टोनपे यांनीच निष्क्रीय प्रशासनाविरूध्द एल्गार पुकारला असून आज पासुन पालीकेसमोर बेमुदत अमरण उपोषण छेडले आहे.विशेष म्हणजे जिल्हाधिका-यांच्या आदेशाला देखील प्रशासनाने ठेंगा दाखवला आहे. दिवसभराच्या उपोषणानंतर विहीत मुदतीस सर्व कामे ठेकेदाराने पुर्ण न केल्यास उचीत कारवाई करण्यात येईल असे लेखी आदेश प्रशासनाने काडल्यानंतर टोनपे यांंचे उपोषण मागे घेण्यात आले.
@ कुर्डूवाडी नगरपालीकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष तर राष्टृवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष आहे.राष्टृवादीकडे बहुमत तर सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत. दोन्ही पक्षाच्या सत्तासंघर्षात विद्यार्थी मात्र भरडला जातोय. कुर्डूवाडी नगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे शहरात महाविद्यालय व इतर शाळा आहेत.या सर्व शाळा महविद्यालातील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे बाथरूम, सौचालये व मुतारी नाहीत.काही आहेत त्या ठीकाणी त्या नादुरूस्त आहेत.त्या दुरूस्त करण्यासाठी शिक्षण समिती सभापती संजय टोनपे यांनी वारंवार प्रशासनास लेखी निवेदन दीले होते.मासिक मिटींगमध्येही यावर चर्चा करण्यात आली होती.मात्र यावर निष्क्रीय प्रशासनाने लक्ष दीले नाही.नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनाही तोडगा काडता आला नाही.किंबहूना शिवसेना जिल्हाध्यक्ष धनंजय डीकोळे यांच्या सहमतीशीवाय त्यांना निर्णयच घेता येत नाही.
@ शिक्षण सभापती संजय टोनपे यांनी याबाबत राष्टवादीचे गटनेते समिर मुलाणी यांना लेखी निवेदन दीले.यावर मुलाणी यांनी 25 मार्च 2026 व 8 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली.नगराध्यक्षा जयश्री भिसे यांना देखील सर्वसाधारण सभेत विषय घेण्यासंदर्भात लेखी कळवले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 25 मार्च व 8 एप्रिल 2026 रोजी नगराध्यक्षा जयश्री भिसे व प्रशासनाला लेखी पत्राद्वारे जनतेला वेठीस न धरता विषय घेण्यासबंधी कळवले .मात्र अद्याप कार्यवाही न झाल्याने संजय टोनपे यांनी अमरण आंदोलन छेडले आहे.
@ चौकट—
@ मी बाहेरगावी आहे.मला आत्ताच उपोषणाला बसले असल्याचे समजले आहे. कुर्डूवाडी नगरपालीकेस प्राँपर मुख्याधिकारी नाही. आपल्या सर्वांना मिळून शहरातील विकास साधायचा आहे.मी मुख्याधिकारी यांच्याकडे आजपर्यंत शहरात जे विकास कामे झाली आहेत ती कधी व केव्हा झाली आहेत याची माहीती मागीतली आहे.ती माहीती अद्याप माझ्यापर्यंत आली नाही.ती माहीती अहवाल माझ्याकडे आल्यास सभेमध्ये विषय घेण्यात येतील. शहरातील विविध विकास कामे करायची असतील तर ते आम्ही सर्वजण मिळूनच करणार आहोत.
जयश्री भिसे.
नगराध्यक्षा कुर्डूवाडी न.पा.
Post Views: 23