माळशिरस ..पालखी मार्गावरील ग्रामपंचायती पालखी मधील वारकऱ्याना सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधी दिला जात होत त्याच धर्तीवर पालखी मार्गावरील नातेपुते ,माळशिरस येथील नगरपंचायातीस तसेच अकलूज नगर परिषदेमधील हद्दीत वारकऱ्याना सेवा सुविधा देण्यासाठी १ कोटी ८१ लाख रुपये मंजूर झाले आहेत.त्यामध्ये माळशिरस नगरपंचायात हद्दीतील कामासाठी ४६ लाख रुपये ,नातेपुते नगर पंचायात हद्दीमधील कामासाठी ५५ लाख रुपये तर अकलूज नगर परिषद हद्दीतील कामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .
माळशिरस नगर पंचायात हद्दीतील पालखीत व परिसर मुरमिकरण २० लाख,पालखीतळ येथे आरोग्य विषयक जंतुनाशक व किताक्नाषक इ कामे ५ लाख ,पालखी तळ व पालखी मार्ग दिवाबत्ती सोय तसेच पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने कामे ५ लाख रुपये,पालखी तळ येथे मंडप व आपत्कालीन मदत केंद्र तयार करणे ५ लाख रुपये ,पालखी तळ येथे तंकर फिडीग पोईट व जलशुद्धीकरण साठी मनुष्यबळ पुरवणे ३ लाख,पालखी मार्ग वारकरी यांचे साठी सर्व अनुषंगिक सेवा सुविधा पुरविणे ८ लाख रुपये असे एकूण ४६ लाख रुपये मंजूर झाले आहेत.या मध्ये मुरमी कर्णाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून इतर कामे नगर पंचायत करणार आहे.
अनेक वर्षाची मागणी मान्य… माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख
पालखी मार्गावरील गावांना वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधी दिला जात होता .परंतु नगर पंचायतींना दिला जात नव्हता याबाबत पाठपुरावा करीत होतो.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याची दखल घेत निधी मंजूर केला आहे.
Post Views: 14