सोलापूर – संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आसरा सोसायटी येथील वडाच्या झाडाचे पुनरोपन केलेल्या ठिकाणी वटसावित्री निमित्त वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले आणि त्याचबरोबर न्यायालयाने नरसापुर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली याबद्दल आनंद व्यक्त करून न्यायालयाचे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली समस्त महिलांच्या उरात धडकी भरवणारी व काहीच सुन्न करणारी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता त्यामुळे सर्व समाजातील महिला स्त्री-पुरुषांनी संताप व्यक्त करून नरसापुर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची सजा देण्याची मागणी केलेली होती.
महाराष्ट्र शासनाने व न्यायालयाने तमाम महाराष्ट्र वाशियांची लोकभावना विचारत घेऊन अवघ्या दोन महिन्यात त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली त्या न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत करून न्यायालयाचे व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो जर अशाच पद्धतीने अत्याचारीत आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावली तर निश्चितच महाराष्ट्र मधील लहान मुली महिला वरील अत्याचाराचे प्रमाण कमी होऊन आरोपीस वचक बसेल आज वटपौर्णिमा या महिलांच्या सणा दिवशी महिला भगिनींना घेऊन वटसावित्रीची विधी पूजन तर केलीच पण त्याचबरोबर आजच्या दिवशी महिलांना या न्यायाच्या रूपाने कायद्यावरील विश्वास सार्थ असल्याचे संकेत मिळाले.
यावेळी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, सोनाली चौरे, दिपाली शिल्पकार, प्रिया मुलादे, शांता जोगदंड, प्रिया काळे, काजल जोगदंड, अर्चना तूपसुंदर, स्वप्न देडे, स्वाती कांबळे, जयश्री पिंपळकर, प्रीती पिंपळकर, रूपाली तानवडे आदी उपस्थित होते.





















